पगारालाही राहिले नाहीत पैसे; पहा सरकारने का केलीय आपली हतबलता जाहीर..!

करोना विषाणूच्या संकटापुढे अवघे जग हतबल झालेले आहे. भारताची अर्थव्यवस्था तर पार रसातळाला गेली आहे. १९९२ पेक्षाही मोठे आर्थिक संकट देशावर आहे. त्यातच दिल्ली सरकारने शिक्षकांचे पगार द्यायलाही पैसे राहिले नसल्याचे म्हटले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

दिल्ली राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, राज्याची आर्थिक स्थिती खूपच नाजूक झालेली आहे. अशावेळी आरोग्य व्यवस्थेवर खर्च करण्याचीच पंचाईत होऊन बसली आहे. मग शिक्षकांचे आणि इतरांचे पगार कसे द्यायचे हाही प्रश्न सरकारसमोर बनला आहे. एकूणच राज्य सरकारने आपली आर्थिक हतबलता यानिमित्ताने स्पष्ट जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारकडून जीएसटीचा परतावा वेळेवर मिळत नाही. त्यातच इतर उत्पन्न घटल्याने एकूण आर्थिक उत्पन्न ५७ टक्क्यांवर खाली आले आहे. अशावेळी सर्वात महत्वाची गरज आहे ती, आरोग्य या घटकावरी खर्चाची. त्यालाच पैसे नाहीत. मग शिक्षकांच्या पगाराला कुठून येणार असा उद्विग्न प्रश्न सिसोदिया यांनी विचारला आहे.

नवभारत टाईम्स या आघाडीच्या हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सिसोदिया यांनी राज्याची ही वाईट परिस्थिती जगजाहीर करून टाकली आहे. एकूण कराच्या संकलनातील केंद्र सरकारचा वाटा तब्बल ८७ टक्के इतका मोठा आहे. त्यातून मग राज्यांना पुन्हा पैसे मागे येण्यासाठीच्या अडचणी आहेत. यातून मार्ग काढणे अगोदरच अवघड बनले होते. त्यात करोनाच्या संकटात यामध्ये आणखी वाईट परिस्थितीचा सामना दिल्ली सरकार करीत असल्याचे सिसोदिया यांनी लक्षात आणून दिले आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here