शिवसेनेचे मराठी प्रेम बेगडी; पहा भाजप नेत्याने का केलीय अशी बोचरी टीका

आत्महत्या केलेल्या सुशांत सिंग याच्या प्रकरणावरून नंतर ड्रग माफियांच्या मुद्यावर आलेला मुद्दा आता अभिनेत्री कंगना राणावत यांच्यामुळे थेट मराठी प्रेमावर घसरला आहे. देशभरात आणि महाराष्ट्र राज्यातही करोनाचे संकट आणखी वाढत असतानाच राजकीय पक्षांना इतर मुद्द्यांनी पछाडले आहे. त्यानुसार भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेचे मराठी प्रेम बेगडी असल्याची टीका केली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उत्तर देताना म्हटले आहे की, हजारो मराठी माणसांचं वीजबिल दामदुप्पट आल, कोरोनाने मुंबईत मराठी माणस गेली, मुंबई दरवर्षी बुडते त्यात मराठी माणसांचं नुकसान होत, त्यावेळी ना #मराठी माणूस आठवत ना मराठी अस्मिता. ज्या १०५ हुतात्मांचे नाव घेतां त्यांना हुतात्मा करणाऱ्या काॅंग्रेससोबत सत्ता भोगतां #बेगडी_मराठी_प्रेम

शुक्रवारी संजय राऊत यांनी मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर म्हटले होते की, मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यालाच प्रत्युत्तर देताना केशव उपाध्ये यांनी मुंबईतील दुरवस्था आणि वाढते विजेचे बिल या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला प्रश्न केला आहे.

एकूणच करोनामुळे होणारे मृत्यू आणि त्यावर ठोस आंदोलन उभे न करता विरोधीपक्ष असलेल्या भाजपने यातून लांब राहण्याचे धोरण ठेवले आहे. तर, महाराष्ट्र सरकारने जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांना काहीचीही किंमत देत नसल्याचेच कृतीतून दाखवले असल्याची चर्चा आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here