धक्कादायक : चीन्यांच्या बाबतीत अमेरिकेचा नवा अहवाल; पहा काय म्हटलेय त्या २०० पानांच्या अहवालात

सध्या माध्यमांमध्ये चीनच्या विरोधी बातम्यांना खूप महत्वाचे स्थान आहे. मुजोर शेजारी असलेल्या चीनच्या कुरापतखोर चालीमुळे असे झालेले आहे. त्याचवेळी भारताकडून डिजिटल सर्जिकल स्ट्राईक केल्याच्याही बातम्या ट्रेंडमध्ये आहे. मात्र, अशावेळी अमेरिकन संरक्षण विभागाने २०० पानांच्या अहवालातून चीनबाबतची नवी आणि धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली आहे.

वास्तविक चीनबाबत आलेली ही माहिती कितपत खरी आहे हे अजूनही वादात असू शकते. मात्र, अमेरिकन गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करी तयारीमध्ये चीन भारताच्या खूप पुढे असल्याचे म्हटले आहे. एकूण आर्थिकदृष्ट्या चीन सक्षम असल्याचे सांगतानाच त्यात म्हटले आहे की, चीनकडे सध्या जगातील सर्वात मोठी नौसेना आहे. समुद्रावर हुकुमत करण्यासाठी म्हणून चीनने ही तयारी केली आहे. त्यांच्याकडील नाविक तयारी अमेरिकेपेक्षाही मोठी आहे.

  तर, चीनने आता थेट रोबोटिक आर्मी उभी करण्याची तयारी केली आहे. कदाचित अशी लष्करी तयारी त्यांची अंतिम टप्प्यात आहे किंवा त्यात त्यांनी खूप पुढे मजल मारली आहे. चीन हा पोलादी हुकुमशाहीच्या तावडीत आहे. त्यामुळे तिथून बाहेर काहीही माहिती मिळणे तसे अवघड आहे. अशावेळी गुप्त माहितीवर आधारित असा हा रिपोर्ट अमेरिकन संरक्षण व्यवस्थेने तयार केला आहे.

  त्यात पुढे असेही म्हटले आहे की, अंतरिक्षातही चीन खूपच पुढे आहे. त्यांनी अवकाशातून भारतासह सर्वच देशांवर लक्ष ठेवणारे खास उपग्रह त्यांनी तैनात केले आहेत. ज्याद्वारे ते कोणत्याही देशाची उपग्रह प्रणाली जॅम करू शकतात. अशा पद्धतीचा अहवाल अमेरिकेने प्रसिद्ध केल्याचे नवभारत टाईम्स या वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे. मात्र, तरीही एक आहे की, अमेरिकेत सध्या निवडणूक चालू आहे. त्यामध्ये चीन हाच महत्वाचा मुद्दा आहे. अशावेळी सरकारी यंत्रणेकडून चीनचा बाऊ आणखी मोठा उभा करून निवडणूक जिंकण्याचा तर हा डाव नाही ना अशीही शंका काही मंडळींनी व्यक्त केलेली आहे. मात्र, जर हे खरे असेल तर आपल्या भारतीयांना अन्नाखी एकजुटीने चीनशी भिडण्याची तयारी करावी लागेल.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here