महाराष्ट्राचा हसतमुख फिनिक्स; वाचा सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील खास लेख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी त्यांच्यावर एक खास लेख फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी त्यांचा एकूण प्रवास आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य यावर प्रकाशझोत टाकला आहे.

त्यांनी लेखात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज वाढदिवस. आयुष्याच्या खडतर रस्त्यावरून चालताना चेहऱ्यावरील स्मितरेषा जराही ढळू न देणाऱ्या सुशीलकुमारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! सुशीलकुमारजींशी गप्पा मारणे, हा आगळाच आनंद ! साहित्य, कला क्षेत्रातील अनेक नामांकित व नवख्या मंडळींबरोबर त्यांची ऊठबस. एका बाजूला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारखे तत्वज्ञानातील प्रकाण्ड पंडित तर दुसऱ्या बाजूला नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्यासारखे चळवळीतील कार्यकर्ते यांना घेऊन रात्र रात्र गप्पांचे फड जमवण्याचा त्यांना जणु छंदच.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

आठवण सांगताना राऊत सर लिहितात की, त्यांच्या सोलापुरातील घरी, मुंबईतील राईलस्टोन बंगल्यात व दिल्लीतील कोठीवर त्यांना भेटण्याचे शेकडो प्रसंग आले. प्रत्येक भेट काही तरी नवं शिकवून गेली. फिनिक्स पक्षाप्रमाणेच सुशीलकुमारांनी राखेतून उड्डाण केले व गगनाला गवसणी घालण्याची जिद्द बाळगली. सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना त्या वेळी शाळेत बसविलेल्या नाटकातही काम केले.

आता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, April 30, 2020

सुशीलकुमार यांच्या जीवनातील प्रवासाबद्दल त्यांनी लिहिले आहे की, न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्‍लार्कची जागा मिळाली. १९६५ मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली, तिच्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्एल्.बीचे शिक्षण पूर्ण केले.

राजकीय प्रवासही अनेक चढ-उतारांचा व नागमोडी वळणांचा होता. तो त्यांनी लीलया पार केला. महाराष्ट्र राज्यांत मंत्री, मुख्यमंत्री झाल्यावर काही काळ ते आंध्रचे राज्यपालही झाले. नंतरच्या दहा वर्षांत ते केंद्रात विविध खात्यांचे ज्येष्ठ मंत्री होते. अत्यंत कठीण राजकीय परिस्थितीत त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी आली. तीही त्यांनी कौशल्याने पार पाडली. २०१४ व नंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षीतरित्या पराभव झाल्यानंतर सुशीलकुमारांनी निमनिवृत्ती स्वीकारलेली दिसते. त्यांची कन्या प्रणिती सध्या आमदार म्हणून त्यांचा वारसा चालवत आहे. भावी आरोग्यदायी व आनंदी हसऱ्या आयुष्यासाठी सुशीलकुमारांना शुभेच्छा.., असे म्हणून भारतकुमार राऊत यांनी लेखाचा समारोप केला आहे.

टीम कृषीरंगकडूनही विचारी व प्रगल्भ नेत्याला शुभेच्छा..!

संपादन : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here