आणखी एक अमेरिकन कंपनी रिलायन्सला साथ देणार; भारतात ७,५०० कोटींची गुंतवणूक येणार

बिजनेस टायकून मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला ऐन आर्थिक संकटात मोठी उभारी मिळाली आहे. आताही त्यांच्या कंपनीच्या रिटेल डिव्हिजनमध्ये आणखी एका अमेरिकन कंपनीने गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या बातमीनुसार अमेरिकेतील सिल्व्हर लेक नावाची कंपनी अंबानींना साथ देण्यासाठी सरसावली आहे. त्यांनी कंपनीत १.७ किंवा १.८ टक्के इतका हिस्सा विकत घेण्यासाठी ७ हजार ५०० कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी केली आहे. एकूणच या गुंतवणुकीनंतर रिलायन्स आणखी एकदा जोशात मार्केट काबीज करायला निघणार आहे. अशा पद्धतीने ही अमेरिकन कंपनी भारतात गुंतवणूक करणार असल्याने ज्यांच्याकडे रिलायन्स कंपनीचे शेअर आहेत त्यांनाही उभारी मिळणार आहे.

  भारतातील रिटेलिंगचे मार्केट मुठ्ठी मे करण्याची तयारी करून अंबानींची रिलायन्स सरसावली आहे. जगभरातून या कंपनीला मोठी आर्थिक गुंतवणूक मिळत आहे. रिलायन्सच्या रिटेल डिव्हिजनची किंमत आता ४.३ लाख कोटी इतकी झाली आहे. तीन महिन्यात या कंपनीने जगभरातून किमान १.५२ लाख कोटी रुपये इतकी गुंतवणूक मिळवली आहे. यापूर्वीच सिल्व्हर लेक यांनी या कंपनीत १० हजार २०२ कोटी इन्व्हेस्टमेंट केली होती. आता नव्याने गुंतवणूक करून ही अमेरिकन कंपनी आपल्या हिस्सा आणखी वाढवत आहे.

  ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

  https://amzn.to/34Iqf7k

  यापूर्वीची गुंतवणूक ही जिओ प्लॅटफॉर्मसाठी करण्यात आलेली होती. मात्र, आता रिटेल सेक्टरमध्ये आपल्या जुन्या भागीदारांना गुंतवणूक करायचे निमंत्रण रिलायन्स रिटेलने दिले आहे. त्यानुसार या नव्या कंपन्या आता भारतीय रिटेल बाजाराला लक्ष्य करून गुंतवणूक करणार असलायचे फायनान्शिअल टाईम्स यांनी बातमीत म्हटले आहे.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  आता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, April 30, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here