भारताचा रशियाशी महत्वाचा करार; पहा काय होणार आहे भारताला याचा फायदा ते

शंघाई सहयोग संगठन (एससीओ) याच्या बैठकीसाठी सध्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग रशियाच्या दौऱ्यावर आहेत. महिनाभरात रशियाच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा गेलेल्या सिंग यांनी या तीन दिवसांच्या बैठकीतून वेळ काढून रशियाच्या संरक्षण विभागाशी महत्वाचा करार केला आहे. त्यामुळे आता एके २०३ ही आधुनिक राइफल पुढील काळात भारतात तयार होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

रशिया आणि भारत यांची मैत्री स्वातंत्र्याच्या स्थापनेपासून आहे. शीतयुद्धाचा कल चालू असतानाही आणि १९६२, १९६५ व १९७१ च्या युद्धात अमेरिका जेंव्हा शत्रूंना मदत करीत होती तेंव्हाही तत्कालीन राशींन सरकारने (युएसएसआर) भारताला मदत केली होती. वर्षानुवर्षे भारताशी मैत्रीचे संबंध असेलेल्या रशियाने आता पुन्हा एकदा भारताशी महत्वाचे लष्करी करार केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या मैत्रीला आणखी नवा उजाळा देण्याचे काम चालू आहे. त्यानुसार आता पुढील काळात सर्व शस्त्रास्त्रे भारतात बनवण्याची तयारी केलेल्या भारताला मदत करण्यासाठी रशिया सरसावला आहे.

  रशियाच्या स्पुटनिक नावाच्या वृत्तसंस्थेने आपल्या बातमीत म्हटले आहे की, एके ४७ ची पुढील आवृत्ती म्हणजे एके २०३ आहे. इंडियन स्मॉल ऑर्म्स सिस्टम अर्थात 5.56×45 मिमी रायफल याची जागा हे नवीन शस्त्र घेईल. भारताला सध्या ७ लाख ७० हजार इतक्या अशा रायफलींची गरज आहे. त्यातील फ़क़्त १० हजार आयात केल्या जातील. पुढील सर्व रायफली भारतात बनवण्याचे नियोजन केले जाणार आहे.

  तीन दिवसांच्या दौऱ्यात राजनाथ सिंग आणि भारतीय शिष्टमंडळाने अनेक बैठका घेऊन देशाच्या सामरिक व आर्थिक मुद्यावर महत्वाचे करार केले आहेत. राजनाथ सिंग यांनी मॉस्को येथील दुतावासात जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले आहे. एकूणच रशियाचा हा दौरा भारतासाठी खूप महत्वाचा ठरला आहे. अशा पद्धतीने मोदींच्या मेक इन इंडिया या धोरणाला जगभरातून मोठी साथ मिळत आहे.

  संपादन : सचिन पाटील

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here