‘त्या’ कारणाने वाढणार मोबाईलच्या किमती; सणासुदीच्या काळातच ग्राहकांना बसणार फटका

आता पुढील सणासुदीच्या काळात मोबाइल बदलण्यासाठी खास ऑफर्सची वाट पाहणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे. होय, मोबाइलच्या किमती पुढील काही काळात वाढू शकतात किंवा त्याच्यासाठी मिळणाऱ्या ऑफर्सला कात्री लागू शकते.

याला कारण कोणतीही करवाढ वगैरे नाही. तर, मोबाइलसाठी लागणारे डिस्प्ले आणि बॅटरी यांच्यामध्ये आतापर्यंत किमान १५ टक्के इतकी वाढ झालेली आहे. एकूण मोबाइलच्या उत्पादनात या दोन्हींचा खर्च २५ टक्के इतका असतो. असे जर गणित लक्षात घेतले तर, ५००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मोबाइलमध्ये २०० आणि २५ हजारांपेक्षा जास्त किमतीच्या मोबाइलमध्येही सुमारे ४०० रुपये इतकी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मधल्या टप्प्यातील मोबाइलचे भावही अशाच पटीत वाढतील.

  ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

  सध्या १०-१५ टक्के इतकीच दरवाढ झाल्याने मोबाईलचे उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्यांना किमान १५ हजार कोटी रुपये जास्त उत्पादन खर्च येईल. मग तो खर्च ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी मोबाइलच्या किमतीत वाढ होऊ शकते. किंवा ऑनलाईन स्टोअरवर किंवा इतर ठिकाणी ऑफर म्हणून केल्या जाणाऱ्या किमती तरी कमी होतील. आतापर्यंत यावर कोणत्याही कंपनीने आपली भूमिका किंवा धोरण जाहीर केलेले नाही. मात्र, बाजारात भाव वाढ होईल असेच चित्र दिसत आहे.

  दसरा-दिवाळी आणि त्यानंतरच्या काळात याचा परिणाम दिसू शकेल. सध्या सर्व कंपन्यांनी मिळून पुढील सहामाहीत किमान ५ कोटी मोबाइल विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एकट्या भारतात इतके लक्ष्य ठेऊन या कंपन्या मार्केटिंग करीत आहेत.

  संपादन : विनोद सूर्यवंशी

  आता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, April 30, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here