सायकल, दुचाकी व कारमध्ये एकटे असताना मास्क घालण्याबद्दल आरोग्य मंत्रालयाने दिले ‘हे’ उत्तर

करोना विषाणूची साथ आल्यावर नव्याची नवलाई म्हणून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्था आणखी रसातळाला गेली मात्र करोना विषाणू काही हटला नाही. पहिल्या टप्प्यात पोलिसांनी अनेकांची झोडपट्टी करून आजाराच्या नियंत्रणात ‘सिंहाचा वाटा’ उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता लॉकडाऊन उघडल्यावर एकटा माणूस कार, दुचाकी किंवा सायकलवरून जाताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी दंड ठोठावला जात आहे. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

अनेकदा कारमध्ये किंवा दुचाकीवर आपल्याच घरातील एकत्र राहणारे पुन्हा एकत्र प्रवास करतात. जर, ते घरात एकत्र असतील तर किमान कारमध्ये तरी त्यांनी मास्क घालण्याची गरज नाही असे सगळ्यांना वाटते. ते चुकीचेही नाही. मात्र, नियम मास्क घालायचा आहे म्हटल्यावर घातलाच पाहिजे असा अट्टाहास पोलीस आणि सरकारी यंत्रणेने सुरू केला आहे. मुळात दोघांमधील अन्तर ३ मीटरपेक्षा जास्त असल्याचा मुद्दा विसरून मास्कला जास्त महत्व दिले जात आहे. असे चित्र असल्याने मग काहींनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत लिहिले होते. त्यावर मंत्रालयाने आपले म्हणणे मांडले आहे.

  मंत्रालयाने त्यात म्हटले आहे की, दोघांमधील अंतराची अट सर्वांनी पाळावी. तसेच कार, दुचाकी आणि सायकल एकट्याने चालवताना मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नाहीत. मात्र, समूहामध्ये प्रवास करताना, सायकल चालवताना, व्यायाम करताना मास्क वापरावा. महत्वाचे म्हणजे पर्सनल डिस्टंसिंगची अट सर्वांनी पाळावी.

  अशा पद्धतीने आरोग्य मंत्रालयाने यावर नरो वा कुंजरोवा उत्तर देऊन टाकले आहे. एकाच घरात राहणारे एकत्र प्रवास करतानाही मास्क घालण्याची अट अनेकांना विचित्र वाटत आहे. मुळात कारमध्ये नाही, परंतु कारमधून उतरल्यावर आणि दुचाकीवरून किंवा सायकलवरून गर्दीत प्रवास करताना मास्क वापरणे ही सर्वांची गरज आहे. प्रशासनाने त्यासाठी ठोस शास्त्रीय नियमावली बनवून त्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे. अनेकांना हेल्मेटमध्ये मास्क न वापरल्याने कारवाईस सामोरे जावे लागले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध युवा लेखक नितीन थोरात यांनाही हडपसर भागात हेल्मेट असताना आतून मास्क का घातले नाही म्हणून ५०० रुपये दंड भरावा लागला होता. त्यांच्या फेसबुक पोस्टवर अनेकांनी प्रशासनाच्या या दंडवसुलीच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  आता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, April 30, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here