DRS बाबत शशी थरूर म्हणतात की; पहा तेंडूलकर-धोनीबाबत यानिमित्ताने त्यांनी काय म्हटलेय ते

काँग्रेस नेता शशी थरूर म्हणजे अभ्यासू आणि विचारी नेता. त्यांचे इतर फोटो अनेकदा ट्रेंडमध्ये असतात आणि टिकेचेही धनी होतात. मात्र, त्यांच्या एकूणच अभ्यासूपणावर कोणालाही शंका नाही. त्याच थरूर यांनी स्पोर्ट्सकिडा नावाच्या फेसबुक पेजवर भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याबाबत एक मुद्दा मांडला आहे.

थरूर यांनी त्यात म्हटले आहे की, ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डिसिजन रीव्यू सिस्टम (DRS) लागू करण्यात आली त्यावेळी तेंडूलकर आणि धोनी यांना त्यातील चुका आणि नकारात्मक गोष्टी दिसत होत्या. ते अशी सिस्टीम खेळामध्ये आणण्याच्या विरोधात होते. मात्र, अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका वेळोवेळी भारताला बसला होता. त्यामुळे अशी सिस्टीम आणणेच त्यावेळी आवश्यक होते. अर्थात नंतर भारतानेही यात पुढाकार घेतला आणि २००८ मध्ये श्रीलंकन टीमच्या विरोधातील सामन्यात याचा उपयोग सुरू केला.

खेळ पाहताना चुकीच्या निर्णयाचा अनेकदा फटका रसिकांनाही बसत होता. मात्र, आता नव्या निर्णयामुळे खेळातील मजा तर वाढली आहेच. उलट चुकाही खूप कमी झालेल्या आहेत. एकूणच भविष्यात अशा पद्धतीने डिसिजन रीव्यू सिस्टम जर राहिली नाही तर मग खेळ पाहण्याची माझीही इच्छा नसेल. नवीन पद्धतीने खेळ आणखी बेस्ट करणे ही गरज आहे. त्यामुळेच त्यावेळी त्या दोघांचा विरोध माझ्यासाठी चिंतेचा विषय होता. मात्र, ननंतर दोघांनीही याला आपलेसे केले. त्यातही महत्वाचे म्हणजे धोनीने तर Dhoni Review System नावाची नवीन यंत्रणा आणून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या चाहत्यांची ही सिस्टीम खेळाचा आनंद वाढवणारी होती हे नक्की, असेही पुढे थरूर यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here