भीष्माचार्य होते दादाभाई; जयंतीनिमित्त वाचा त्यांच्यावरील लेख

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेचे श्रेय ए. ओ .ह्युम व दिनशा वाच्छा यांच्या बरोबर दादाभाई नौरोजी यांना पण तितकेच जाते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर रोजी झाला. हलाखीची परिस्थिति, दादाभाई चार वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले मात्र तरीही त्यांनी संघर्ष केला,परिस्थितीचे कारण न दाखवता त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई मधी एलफिन्स्टंट इंस्टीट्यूट मधून त्यांनी शिक्षण घेतले. १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. त्याच महाविद्यालयात त्यांनी गणित आणि तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली,अशी महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेले दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय होते.   

त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने खूप सार्‍या नंतरच्या काळात परदेश वार्‍या झाल्या.त्यांनी याच काळात  ’लंडन इंडिया सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. १९०७ पर्यन्त ते या संस्थेचे अध्यक्षा होते. तसेच त्यांनी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असो. नावाची स्थापन केली.

भारतातील अर्थकारण या विषयावर ब्रिटिश सरकारने 1873 मध्ये  नेमलेल्या संसदीय समितीच्या समोर दादाभाई नौरोजी यांनी जी साक्ष दिली होती ती आजही भारताच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणार्‍या लोकांच्या स्मृति पटलावर जशीच्या तशीच आहे. त्यांनी संगितले होते की भारतीयांचे सरासरी आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 20 रुपये आहे; याचबरोबर त्यांनी हे पुरावे देऊन सिद्धा सुद्धा करून दाखवले होते. त्यांनी कॉंग्रेस चे स्थापनेत जसा पुढाकार घेतला तसेच ते 1886,1893,1906 असे तब्बल तीन वेळेस अध्यक्ष पदावर राहिले. त्यांनी कॉंग्रेस चा विचार जनमानसत रुजवण्याचे काम त्या वेळी भक्कम पाने केले होते. भारतातील एकमेव ते अशी व्यक्ति होते की त्यांनी लंडन च्या लिबरल पक्षाच्या मार्फत सदस्य म्हणून निवड होऊन ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे ते पहिली व्यक्ति होते व  त्याच वेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या साथी आवाज उठवणारे पण पहिले भारतीय होते.

त्यांनी नामांकित अशा महत्वाच्या नियतकालिकांच्या माध्यमातून अनेक लेख आणि निबंध लिहिले.  भारताच्या अर्थ शास्त्रीय विभागात त्यांचे मौलिक करी म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पपणाचे निर्धारण त्यांनी केले. ब्रिटिश सरकारने  चालवलेल्या आर्थिक पिळवणुकीवर त्यांनी, आर्थिक लूटीवर त्यांनी वेळोवेळी खडे बोल सुनावले. भारताने स्वयंपूर्ण व्हावं असे त्यांचे स्वप्न होते. स्वदेशी व्यवसाय भारतीयांनी मोठ्या प्रमाणात करावेत अशी त्यांची वेळोवेळी भूमिका राहत असे. त्यांनी फक्त बोलून न थांबता, जमशेदजी टाटा यांना पोलाद कारखाना उभारण्यासाठी लोकांच्या कडून भांडवल गोळा करण्यासाठी आवाहन केले होते.

संदर्भ :- मराठी विश्वकोश 

संपादन : गणेश शिंदे

आता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, April 30, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here