त्यानंतर कार-दुचाकीचे भाव होणार कमी; पहा केंद्र सरकार कशी करणार आहे मदत ते

करोना विषाणूचा कहर वाढत असतानाच लॉकडाऊन आता काढण्यात येत आहे. अशावेळी अगोदरच अडचणीत असलेली भारतीय अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडली आहे. या कठीण काळात ऑटो सेक्टरमध्ये मोठी मंदी आहे. कार, दुचाकी व स्कूटर यांची विक्री बाधित झालेली आहे. त्यामुळेच या सेक्टरला बुस्टर डोस देण्यासाठी आता केंद्र सरकार जीएसटी दर कमी करणार आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

केंद्र सरकारने जर अशा पद्धतीने जीएसटी कर कमी केला तर कार व दुचाकीचे भाव कमी होतील. केंद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी किमान १० टक्के GST कमी होणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. सोसाइटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरर्स (SIAM) यांच्या ६० व्या संमेलनात जावडेकर यांनी ही माहिती दिली. तसेच हे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. एकूणच जर असा निर्णय झाला तर मग कमी किमतीत कार व दुचाकी खरेदीची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

  सध्या चारचाकी, दुचाकी व तीनचाकी वाहनांना २८ टक्के इतका जीएसटी कर लावला जात आहे. तो १८ टक्के करण्याची जुनी मागणी आहे. करोनाच्या आर्थिक मंदीच्या निमित्ताने आता सरकारने याकडे लक्ष दिलेले आहे. अशा निर्णयाची वाटच कंपन्या आणि ग्राहक पाहत आहेत. आताही जावडेकर यांनी असे आश्वासन दिल्यावर लगेचच सगळ्यांनी त्याचे स्वागत केले आहे.

  संपादन : गणेश शिंदे

  होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here