वर्ल्ड्स ब्रँड देत आहेत चिन्यांना झटका; चीनच्या उत्पादकांना बसतोय कोट्यावधींचा फटका

चीन या भारताच्या शेजारील देशाची मुजोरी आता अवघ्या जगभरात चर्चेत आहे. या देशातील सरकारच्या मुजोरीचा आणि बेजबाबदार वागण्याचा फटका आता तेथील कंपन्यांना बसण्यास सुरुवात झालेली आहे. असेच जर चक्र चालू राहिले तर चीनमध्ये बेरोजगारी वाढेल. त्याचवेळी भारताला मात्र याचा मोठा फायदा होईल असे चित्र आहे.

जगातील अनेक नामांकित ब्रँड आतापर्यंत चीनमध्ये वस्तू आणि उत्पादनांची निर्मिती करीत होते. कमी पैशात उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने असे चक्र चालू झालेले होते. चीन हा जगातील एक प्रमुख उत्पादक देश बनला होता. मात्र, आता हेच चक्र उलटे फिरण्यास सुरुवात झालेली आहे. जगातील अनेक ब्रँड आता चीनमधून नाही तर भारत आणि इतर देशांमधून आपली उत्पादने बनवण्यासाठी तयार झालेले आहेत. एकूणच यामुळे फॅशन क्षेत्रात मेक इन इंडिया रुजण्यास सुरुवात झालेली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

करोना विषाणूचा फैलाव, त्याबाबत चीनने दाखवेलेली बेजबाबदार प्रवृत्ती आणि नंतर भारतासह इतर शेजारी देश आणि इतर देशांना चीनकडून होणारा त्रास यामुळे आता चीन देश एकटा पडत आहे. अशावेळी कंपन्यांनी जोखीम टाळण्यासाठी नवीन व्हेंडर डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलेले आहे. त्यानुसार मार्क पोलो आणि कार्टर या दोन जगप्रसिद्ध कंपन्यांनी भारतात उत्पादनास प्राधान्य दिले आहे. इतरही कंपन्या आता त्याचा मार्गाने भारतातील उत्पादनाची ऑर्डर वाढवत आहेत. आतापर्यंत वारसॉ इंटरनेशनल आणि एसपी अपेरल्स यांना आता कपड्याच्या अनेक उत्पादनांची निर्मिती करण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या दोन्ही कंपन्या मार्क पोलो आणि कार्टर यांच्याकडे जुन्याच मात्र छोट्या व्हेंडर म्हणून काम करीत होत्या. मात्र, आता त्यांना या कंपन्यांनी मोठ्या ऑर्डर देण्यास सुरुवात केली आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here