चीन येतोय लाईनीत; मागितली संरक्षण मंत्र्यांची भेट, पहा रशियात काय घडलेय ते

भारत-चीन सीमावाद गंभीर वळणावर असतानाच देशाचे संरक्षण मंत्री सध्या पुन्हा एकदा रशियामध्ये आहेत. शंघाई सहयोग संगठन (एससीओ) याच्या महत्वाच्या बैठकीसाठी राजनाथ सिंग तिथे असून त्यांनी रशियाच्या संरक्षण विभागासोबत काही महत्वाचे करार केलेले आहेत. त्याचवेळी चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंग यांन भेटीची वेळ मागितली आहे.

लडाखमधील तणावाच्या वातावरणात दिवसेंदिवस भर पडत आहे. चीनने दावा केला आहे की, भारताचे सैन्य त्यांच्या हद्दीत आहे. तर, भारताने चीनी सैन्याला सीमेवर रोखून धरले आहे. अशाच तणावाच्या वातावरणात आता भारताने चीनी कंपन्यांवर डिजिटल स्ट्राईक करून सुमारे २२५ मोबाइल अॅप्लिकेशन बंद करून टाकले आहेत. त्याने चीनचा तिळपापड झाला आहे. मोठी आर्थिक हानी होणार असल्याने चीन लाईनीत यायला सुरुवात झालेली दिसते. सध्या भरती आणि चीन दोन्हींचे संरक्षण मंत्री रशियात आहेत. तिथेच चीनच्या शिष्टमंडळाने राजनाथ सिंग यांना भेटीची वेळ मागितली आहे. शुक्रवारच्या बैठकीसाठी अजूनही राजनाथ सिंग यांनी मात्र अधिकृतरीत्या वेळ दिलेली नाही. त्यामुळे ते चीनच्या मंत्र्यांना भेटणार किंवा नाही हे दुपारच्या टप्प्यात स्पष्ट होईल.

  काल, राजनाथ सिंग यांनी रशियाचे संरक्षण मंत्री यांच्याशी बैठ केली. त्यात महत्वाच्या करारावर चर्चा झाली. तसेच राजनाथ सिंग यांनी तेथील भारतीय दुतावासात जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. या दोन्ही ठिकाणचे फोटो ट्विटरवर टाकून राजनाथ सिंग यांनी रशियाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. एकूणच आज ते चीनी शिष्टमंडळास भेटणार की नाही याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

  संपादन : माधुरी सचिन चोभे

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here