भारताने दिला चीनला आणखी एक झटका; पहा काय निर्णय घेतलाय मोदी सरकारने ते

लडाखमधील तणावाचे वातावरण निवळण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. अशावेळी मोदी सरकारने चीनी कंपन्यांचे सुमारे २२५ मोबाइल अॅप्लिकेशन बंदीच्या जोखडात अडकवले आहेत. त्याने अगोदरच निराश झालेल्या चीनने भारताने ‘ही चूक सुधारा’ असे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता चीन्यांना आणखी एक झटका दिला आहे.

चाइनीज असोसिएशन फ़ॉर इंटरनैशनल अंडरस्टैंडिंग (CAIFU)  नावाच्या सामाजिक संस्थेच्या मार्फत अनेकजण भारतात येत असतात. अशा मंडळींना आता भारतात येताना एकदम कडक अशा व्हिसा प्रक्रियेतून जावे लागणार आहे. या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षस्थानी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे महत्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याच या संस्थेच्या मार्फत भारतातील माहिती घेण्यासाठी काहीजण येत असतात अशी शंका अनेकदा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यातच आताच्या तणावाच्या वातावरणात भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाने त्या येणाऱ्या चीन्यांवर कडक निर्बंध नाही, मात्र त्यांची इकडे येण्याची प्रक्रिया जटील करून टाकली आहे.

  याबाबत भारत सरकारने अजूनही काहीच माहिती दिलेली नी. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाईम्स यांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे. यूनाइटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट हा चीनच्या बाबतीत काम केल्याचे भासवतानाच इतर देशातील नागरीकांना प्रभावित करीत असलायची शंका आहे. याप्रकरणी रॉयटर्स या जागतिक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत चीनमधील या संस्थेचे उपाध्यक्ष जी बिंगक्सुआन यांनी म्हटले आहे की, आमची संस्था चीन आणि इतर देशाती नागरिकांमध्ये मैत्रीचे संबंध वाढावेत आणि संस्कुतिक आदान-प्रदान वाढावे यासाठीच काम करीत आहे. चीन सरकारसाठी आमची संस्था काम करीत नाही.

  संपादन : सचिन पाटील

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here