Breaking : संरक्षणमंत्र्यांनी सुनावले चिन्यांना खडे बोल; पहा रशियामध्ये काय म्हटलेय त्यांनी

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी रशिया-भारत यांच्यातील विविध द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. तर, तिथेच परिषदेसाठी आलेल्या चीनी संरक्षणमंत्र्यांच्या समोरच सिंग यांनी चीन्यांना खडे बोल सुनावले आहेत.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या अपडेटनुसार सिंग यांनी या परिषदेत बोलताना चीनचे थेट नाव न घेता  प्रादेशिक व जागतिक शांततेला धोका निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, प्रादेशिक सहकार्य आणि दोन देशानाम्धील परस्पर विश्वास यावर सर्व काही सुरळीत चालू असते. मात्र, काही देश आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि संकेतांचा भंग करीत अआहेत. अशावेळी भारत त्यांना सहकार्य करेल असे नाही.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

एकूणच लडाख भागामध्ये चीन व भारत यांच्यातील सीमावाद गंभीर वळणावर आहे. अशावेळी कोणत्याही घटकाने केलेली किरकोळ चूक मोठ्या घटनेसाठी निमित्त ठरू शकते. भारताला याचे पूर्ण भान आहे. मात्र, भारत कमजोर नाही. इतरांनी तसे समजण्याची अजिबात चूक करू नये असेही राजनाथ सिंग यांनी तिथे सूचित केले आहे. त्यावर आता चीनकडून काय प्रतिक्रिया येते याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here