ब्लॅक फ्रायडे; मिनिटभरात २ लाख कोटी डुबले, पहा नेमके काय कारण घडले त्याला

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी बाजारात तेजी राहण्याचा अंदाज वाटत असतानाच पुन्हा एकदा शेअर बाजाराने मोठी आपटी खाल्ली आहे. मिनिटभरात बाजाराचा कल बदलला आणि मग गुंतवणूकदारांनी आपले किमान २ लाख कोटी रुपये झटक्यात गमावले आहेत.

बाजाराची अस्थिरता हा सध्या गुंतवणूकदारांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. अशावेळी अनेकजण जास्त गुंतवणूक न करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, काही सटोडिये यातही आनंद घेत आहेत. जगभरातील बाजारात सध्या घसरण होत असल्याचा आणि त्यातच अमेरिका-चीन, भारत-चीन आणि इतर देशामध्ये निर्माण होत असलेल्या तणावामुळे बाजारात विक्रीचा तणाव वाढला आहे. अशावेळी आज आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सेंसेक्स ६५० अंकांनी पडला आहे. परिणामी अनेकांची गुंतवणूक कमी झाली आहे किंवा डुबली आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

https://amzn.to/34Iqf7k

ICICI, SBI, कोटक, एक्सिस, इंडसइंड बँक, HDFC आणि एचसीएल टेक यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली. एकूणच बहुसंख्य मोठ्या आणि माध्यम कंपन्यांच्या शेअरची विक्री जोरात सुरू झाल्याचा मोठा फटका दुपारपर्यंत बाजाराला बसला आहे. नंतर काहीअंशी बाजारात सुधारणा होत आहे. मात्र, बाजार बंद होताना काय स्थिती राहील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

आता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, April 30, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here