बिहारच्या निवडणुकीबाबत आली महत्वाची बातमी; पहा काय म्हटलेय इलेक्शन कमिशनने

करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत बिहारमधील विधानसभा निवडणुक वेळेवर होणार की पुढे ढकलली जाणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचे वातावरण तापल्याने आता नेमके काय होणार याचीच उत्सुकता होती अनेकांना निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता वाटत होती. मात्र, संर्व शंका-कुशंका बाजूला सारत निवडणूक आयोगाने वेळेवर निवडणूक घेण्याचे सुतोवाच करून टाकले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, बिहार विधानसभेची निवडणूक ठरलेल्या कालावधीत होईल. उलट त्याच निवडणुकीच्या वेळापत्रकामध्ये  एक लोकसभेची जागा आणि इतर ठिकाणच्या आणखी ६४ विधानसभेच्या जागांवर म्हणजे एकूण 65 ठिकाणी उपचुनाव घेण्यात येतील. त्यामुळे आता या निवडणुका लांबणीवर पडणार आणि कधी होणार या चर्चेवर पडदा पडला आहे.

  २९ नोव्हेंबर २०२० पूर्वीच येथील निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची तयारी करण्यात येत असल्याचे एएनआय या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. ऑनलाइन नॉमिनेशन आणि जमानत रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याची सोय या निवडणुकीत देण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया आणि प्रचार यासाठीही खास नियमावली लागू करण्यात येणार आहे. एकूणच सर्व काळजी घेऊन आणि करोना विषाणूचा फैलाव होणार नाही याची काळजी घेऊनच ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठीच्या तारखा आणि वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

  तर, येथील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्नशील राहणार आहेत. त्याचवेळी पुन्हा एकदा हे राज्य ताब्यात घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांचे समर्थक तयारीला लागलेले आहे. त्यामुळे या चुरशीच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष असणार आहे.

  संपादन : सचिन पाटील

  होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here