होय, हेडिंग वाचून उगीचच शॉक होऊन जाऊ नका. किंवा ही फेक न्यूज आहे असाही गोड ग्रह करून घेऊ नका. योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणून ही माहिती नक्कीच वाचा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. कारण, ही माहिती आहे १० हजार रुपयांचे २५ लाख करण्याची.. तेही फ़क़्त १० वर्षांमध्ये..!
ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.
शेअर बाजार म्हणजे सट्टाबाजार, असे मराठी माणूस म्हणतो. जसा सत्ताबाजार (राजकारण) मराठी जनतेला आपला प्रांत नसल्याचे वाटते तोच प्रकार शेअर बाजाराबाबतही. म्हणूनच त्याला सट्टाबाजार असे म्हणून आपण दूर फेकतो. परंतु, आता नवी पिढी मात्र याकडे गुंतवणूक करून पैसे कमावण्याच्या दृष्टीने पाहत आहे. त्यांच्यासाठी हा खास महत्वाचा लेख. मित्रांनो आणि मुख्य म्हणजे मैत्रिणींनो, या लेखामध्ये दिलेली माहिती वास्तव आहे. फ़क़्त लगेचच हे वाचून कोणत्याही शेअरमध्ये पैसे टाकून तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही. यासाठी कंपनीचा अभ्यास करा, मार्केट ट्रेंड ओळखा आणि वेगवेगळ्या शेअरमध्ये पैसे गुंतवून ठेवा. मुख्य म्हणजे लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट करा आणि मगच जास्त पैशांची अपेक्षा ठेवा.
आता बाष्कळ गप्पा खूप झाल्या. मुख्य मुद्यावर येउया. आजच्या पहिल्या लेखात आपण दोन शेअरची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये अवंति फीड्स या फूड सेक्टरमधील (प्रॉन आणि फिश फीड्स) कंपनीची अगोदर माहिती घेऊया. या कंपनीत १० वर्षांपूर्वी ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांना बेस्ट रिटर्न मिळाले आहेत. १० वर्षांपूर्वी फ़क़्र २ रुपड्यांना मिळणारा हा शेअर सध्या ५१५ रुपये इतका वर केलेला आहे. या शेअरने ७६९.९० ते टार्गेट अचिव्ह केले होते. एकूणच जर १० वर्षांपूर्वी ज्यांनी कोणी गुंतवणूक केली होती त्यांना याद्वारे २६,४९४ टक्के इतकी ग्रोथ मिळाली आहे. जूनच्या तिमाहीत या कंपनीने १४ टक्के वाढीसह ११६ कोटी रुपये कमावले आहेत.
दुसरा शेअर आहे कैपलिन प्वॉइंट लिमिटेड यांचा. ही कंपनी आहे फार्मा आणि हेल्थ सेक्टर यामधील. उत्पादन आणि विक्री अशा दोन्हींमध्ये ही कंपनी काम करते. १० वर्षांपूर्वी फ़क़्त ३ रुपयांना असलेल्या या कंपनीच्या शेअरने सध्या ५४० रुपये इतकी मजल मारलेली आहे. इतकेच नाही हा शेअर थेट ६८६ रुपयांना शिवून आलेला आहे. या कंपनीने २०,३८३ टक्के इतकी जबरदस्त वाढ देऊन १० वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्यांना मालामाल केले आहे. यासह जूनच्या तिमाहीत या कंपनीने ९ टक्के नेट प्रॉफिटसह ५४ कोटी रुपये कमावलेले आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
माहितीचा स्त्रोत : फायनान्शियल एक्स्प्रेस
ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.