७/१२ बद्दलची ‘ही’ महत्वाची बातमी वाचली का; वाचा आणि शेअरही करा

तलाठ्याकडून ७/१२ उतारा घेणे म्हणजे maha जिकीरीचे काम. हे कर्मचारी कामावर कमी आणि इतरत्र जास्त मिळतात. महसूल विभागाचा गावातील दुवा असलेल्या याच तलाठ्यांचे काम आणखी सुकर करण्यासह शेतकऱ्यांना वैशिष्ट्यपूर्ण असे उतारे देण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

याबाबत माहिती देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, सुमारे आठ दशकानंतर म्हणजे ८० वर्षांनी राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत आहे. आताच्या नव्या सात-बारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत.  प्रत्येक गावासाठी युनिक कोड, सात-बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे पुढील काळात सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार आहे.  शासनाने ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल केला आहे. ब्रिटीश काळात एम. जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये १९४१ मध्ये एम. जे. देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास  मागील आठ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत आहे. प्रत्येक गाव व खातेदार यांना स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर ७ अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

  नव्या बदलामध्ये गाव नमुना नंबर ७ यात गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही. मात्र, आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आर यासोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहेत. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सात-बारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत  होईल असा विश्वास थोरात यांनी प्रेसनोटमध्ये व्यक्त केला आहे.

  संपादन : सचिन पाटील

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here