‘त्या’ कंपन्या करणार नोकरभरती; १ लाखांपेक्षा जास्तीची भरती होण्याची शक्यता, वाचा अन शेअर करा

सध्या करोना आणि त्यामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्था गोत्यात आलेली आहे. अशावेळी देशभरात किमान १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, त्याच नकारात्मक चर्चेच्या आणि बातम्यांच्या काळात आता एक आशादायक बातमी आली आहे. होय, ती आहे किमान १ लाखापेक्षा जास्त नोकर भरतीची..!

इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने यावर फिचर स्टोरी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि इतर कंपन्यांमध्ये डिजिटल व टेक्निकल विभागात या नव्या नोकरभरतीची तयारी चालू झालेली आहे. अशा पद्धतीने या नोकर भारतीने बेरोजगार तरुणांना आणखी नवी उभारी आलेली आहे.

  स्‍पेशलिस्‍ट स्‍टाफिंग फर्म एक्‍सफीनो यांच्या आकड्यांचा अभ्यास करून आणि लिंक्‍डइन वेबसाईटवर कंपन्यांनी टाकलेल्या एकूण रोजगाराच्या उपलब्धतेबाबत असलेल्या माहितीनुसार असे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेपी मॉर्गन चेज, गोल्‍डमैन सैक्‍श, पेपॉल, अमेजन, आईबीएम इंडिया, एजुकॉम्‍प, एक्‍सेंचर, सिस्‍को, टाटा कंसल्‍टेंसी, एमफेसिस, हनीवेल, गूगल, वेल्‍स फारगो, यूनिलीवर, डेलॉयट, जीई हेल्‍थकेयर, फिलिप्‍स आणि ग्‍लैक्‍सोस्मिथक्‍लाइन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती होण्याची चिन्हे आहेत.

  आईटी आणि आईटीईएस सेक्‍टर यासह बीएफएसआई, फार्मा, एडटेक, ऑटोमोटिव, फिनटेक, इंफ्रास्‍ट्रक्‍च, ऑयल व एनर्जी या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात पुढील काळात नोकर भरतीची शक्यता असल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. टेक महिंद्रा यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्‍लाउड, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, ब्‍लॉकचेन, 5जी, इंटरनेट ऑफ थिंग्‍स आणि साइबर सिक्‍योरिटी यामध्ये भरती होणार आहे. त्यासाठी नोकरी नसलेल्या, शोधात असलेल्या किंवा नोकरीत बदल करण्यासाठीची प्रतीक्षा करणाऱ्यांनी याकडे लक्ष ठेऊन राहण्याची गरज आहे.

  मूळ बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://economictimes.indiatimes.com/hindi/wealth/kamai/good-news-for-it-professionals-more-than-one-lakh-job-opportunities-in-companies/articleshow/77925361.cms

  संपादन : विनोद सूर्यवंशी

  आता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…

  Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, April 30, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here