आता घरातच होणार थेटर; पहा ‘झी’वाल्यांनी कोणती सेवा आणलीय खास

नवीन रिलीज झालेला सिनेमा कुठे पाहायचा असा प्रश्न आता मिटल्यात जमा आहे. कारण कारोनाच्या काळात एकतर नवीन सिनेमे प्रदर्शित करणे अवघड होऊन बसले होते. त्यात OTT प्लॅटफॉर्म अर्थात ऑनलाईन व्हीडीओ स्ट्रीमिंगवर सिनेमा पाहण्याची सवय काही आपल्याला नव्हती. त्यापेक्षा टीव्हीवर सगळ्या घरच्यांनी सिनेमा पाहण्याचा आनंद देणारी सुविधा आता झी समूहाने आणली आहे. तिचे नाव आहे जी प्लेक्स..!

त्यांनी यासाठी डिश डी२एच टीव्ही, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल यांच्याशी याबाबतीतचा करारही केला आहे. त्यानुसार आता यापुढे सिनेमा रिलीज झाला की सर्व कुटुंबियांना तो एकाचवेळी एन्जॉय करण्याची सोय सुरू होणार आहे. २ ऑक्टोबर २०२० पासून ही सेवा सुरू होत आहे. काल झी एंटरटेनमेंट यांनी याची घोषणा केल्यावर शेअर बाजारातही इन्व्हेस्टर मंडळीनी याचे उत्साहात स्वागत केले. या कंपनीच्या शेअरमध्ये काल त्यामुळे तब्बल ८.१३ टक्के इतकी वाढ दिसली.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

सिनेमा थिएटर बंद पडल्याने नवे सिनेमा कसे रिलीज करायचे हाच कळीचा प्रश्न बनला होता. आता त्यावर उत्तर म्हणून हा नवा जी प्लेक्स आता बाजारात येणार आहे. नवीन कल्पना वास्तवात आणण्याची झी समूहाची खासियत आहे. अशावेळी त्यांनी अभ्यास करून मार्ग काढला आहे. त्यामुळेच आताही माध्यम आणि मनोरंजन जगतात या कंपनीचा दबदबा कायम आहे. या कंपनीच्या या सेवेला लॉकडाऊन आणि सिनेमागृहात जाऊन वेळ नसताना घरीच सिनेमा पाहण्याची संधी मिळणार असल्याने मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता चित्रपट निर्मात्यांना वाटत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here