गुड न्यूज वाचा; ‘या’ औषधांमुळे करोना रुग्ण होतील लवकरच बरे, पहा काय म्हटलेय WHO ने

सध्या करोना विषाणूचा कहर जोमात आहे. अशावेळी रुग्णांच्या लक्षणांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करून लस व औषध शोधण्यात संशोधक गर्क आहेत. अजूनही यावर ठोस उपाय सापडलेला नाही. मात्र, कोविड १९ च्या गंभीर आजारी रुग्णांना बरे करण्यासाठी स्‍टेरॉइड  उपयोगी ठरत असल्याची गुड न्यूज आलेली आहे.

होय, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे सामन्यांची लाडकी बनलेल्या WHO ने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, डेक्सामेथासोन, हाइड्रोकार्टिसोन आणि मिथाइलप्रेडिसोलोन या सारख्या माफक दरामध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या स्‍टेरॉइडचा वापर करून गंभीर रुग्ण बरे होऊ शकतात. सुमारे १७०० रुग्णांवर अभ्यास करून सदरचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. यूनिवर्सिटी आफ आक्सफोर्ड येथील डॉ. मार्टिन लैंड्री यांनी यावर म्हटले आहे की, अशा पद्धतीने स्‍टेरॉइडचा वापर करून रुग्ण आजारी होत असल्याने आता पुढील दिशा मिळाली आहे.

तर, जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल एसोसिएशन यांचे प्रधान संपादक हावर्ड सी बाउचर यांनी म्हटले आहे की, संशोधक व डॉक्टर यांनी हा चांगला पर्याय शोधला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील रुग्णांना उगीचच गरज नसताना जर स्‍टेरॉइडचा वापर केला तर किंवा जास्त प्रमाणात डोस देण्यात आला तर इतरही काही समस्या रुग्णांमध्ये दिसू शकतात. त्यामुळेच याचा योग्य पद्धतीने आणि गरजेनुसार वापर करण्याची आवश्यकता आहे. इंपेरियल कॉलेज ऑफ लंडन येथील डॉ. एंथनी गॉर्डन यांनीही हा संशोधनातील महत्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here