त्यांनतर UNLOCK झालेत ‘हे’ शेअर; तीन महिन्यात १५० % वाढ, पहा यादी

करोना विषाणूची साथ आटोक्यात आणण्यासाठीचा प्रयत्न म्हणून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, त्यानेही काहीच विशेष फरक न पडल्याने नंतर अनलॉक सुरू झाले. अखेरीस आता कोईद १९ आजारासह जगण्याचा संदेश सरकारी पातळीवरून येऊन देशातील कारभार सुरळीत झाला आहे. मात्र, लॉकडाऊन झाल्यावर खाली गेलेला शेअर बाजारात वेगाने पुढे येत आहे. त्यातही असे काही शेअर आहेत ज्यांनी अनलॉक सुरु झाल्यावर १५० टक्क्यांपर्यंत वाढ दर्शवली आहे.

इक्विनॉमिक्स रिसर्च एंड एडवाइजरी यांचे संस्थापक आणि सीईओ जी चोक्कालिंगम यांनी फायनान्शियल एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले आहे की, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अजूनही अनेकजण पैनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करीत आहेत. जे धोकादायक आहे. या यादीत असेही काही शेअर आहेत. कंपनीची स्थिती आणि एकूण त्यांचा व्यवसाय याच्या विपरीत त्यांचे शेअर वाढत आहेत. यामध्ये ट्रांसग्लोब फूड्स लिमिटेड, श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड, इंटेग्रा गारमेंट्स एंड टेक्सटाइल्स लिमिटेड, रतन इंडिया इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि तिरुपति टायर्स लिमिटेड हे शेअर आहेत.

  तर, या यादीमधील शेअर असे (कंसात त्यांच्यामध्ये तीन महिन्यात झालेली वाढ टक्केवारीमध्ये) : इंटीलेक्ट डिजाइन अरेना १६६, डिशमैन कॉर्बोजेन १५९, लॉरस लैब १५०, डिश टीवी १४६, वैरोक इंजीनियरिंग १२०, बिरला साफ्ट ११७, अडानी ग्रीन १०९, आईडीएफसी लि. ९८, अडानी इंटरप्राइजेज ९५, जेनसार टेक ९४, साइंट ९४, ग्रेनुअल्स इंडिया ९१, Firstsource सॉ. ९१, आईआरबी इंफ्रा ८९, इमामी लिमिटेड ८९ आदि.

  आताही यातले अनेक शेअर वरती डोके काढूनच पुढे निघालेले आहेत. मात्र, करोना विषाणूवरील लस मिळण्याची काहीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत. त्यातच बाजारात करेक्शन येण्याचीही शक्यता आहे. अशावेळी ही पुढील यादी पहा, मस्तपैकी त्यावर अभ्यास करा आणि मगच ते शेअर विकत घ्यायचेत किंवा आपल्याकडे असल्यास विकायचेत याचा निर्णय इन्व्हेस्टर म्हणून स्वतः घ्या. या शेअरने मोठी उडी घेतलेली आहे. यातील काहींची उडी पुढेही जाऊ शकते. तर काहींना पाठीमागे येण्याचीही वेळ येऊ शकते.

  संपादन : सचिन मोहन चोभे

  स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

  Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here