अशा पद्धतीने कर्जतच्या सोनालीने केली सुवर्ण कमाई; वाचा प्रेरणादायी कथा

अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कपरेवाडी येथे राहणारी सोनाली मंडलिक म्हणजे अस्सल सोनं.. होय, कारण तिने ताशी कमाई केली आहे.. तिने जानेवारीमध्ये गुहावटी येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण कमाई केली होती. सोनालीने ही सुवर्ण कमाई केली आहे फ़क़्त जिद्द आणि कष्टांच्या जोरावर.. त्यामुळेच आज वाचूयात आपण तिची ही सुवर्नागाथा..!

इंडीजर्नलला ती याबद्दल बोलताना म्हणाली की, ‘माझे वडील माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. ते माझ्यामागे खंबीरपणे उभा राहतात. वेळोवेळी, समाजातील येणारा दबाव, मुलगी खेळत आहे म्हणून होणारी टीका अशा सगळ्या वेळी ते न डगमगता उभा राहतात.’ तिची कुस्तीची विजयी घोडदौड ही १० वर्षाची असताना सुरुवात झाली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी ही मान, सन्मान, आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर कुटुंबाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊ शकते. होय, सोनालीने हे सिद्ध करून दाखवले आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

कुस्ती हा पुरुषी खेळ प्रकार आहे अशी जी काही संकल्पना जनमानसत आहे; मात्र अशा खुळचट संकल्पनांना सोनालीसारख्या कर्तबगार मुलीने मोडीत काढण्याचे काम आपल्या क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून केले. कर्जतमध्ये ती सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांच्या कुस्तीच्या आवडीमुळे तिलापण कुस्तीमध्ये आवड निर्माण झाली. तिने इयत्ता ६ वीमध्ये शिकत असताना गुजरातमध्ये पहिला राष्ट्रीय सामना खेळला. त्याच ठिकाणी तिला पहिले पदक मिळाले. पाहिल्याच सामन्यात पदक जिंकणे ही खूप मोठी गोष्ट होती. 

२०१७ – २०१८ मध्ये सोनालीने शाळांतर्गत क्रीडा स्पर्धेत दिल्ली येथे झालेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ मध्ये पदक जिंकले. ती सांगते की, माझे गाव हे कर्जत शहारच्यापासून चार किलोमीटर दूर आहे. सुरुवातीच्या काळात मला चांगला पोषक आहार घेण्यासाठी पण पैसे नव्हते, त्यावेळी कशीबशी माझ्या वडिलांनी माझ्या आहाराची तडजोड केली. तसाही कर्जत, जामखेड हा भाग मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यात बिगरशेती असणार्‍या कुटुंबातील मी असल्याने वडिलांना कमी पैशयात कुटुंब चालवण्यासाठीचा संघर्ष करावा लगायचा. मात्र, त्यांनीच मला प्रेरणा दिली आणि मी काहीतरी करू शकले.

सुरूवातीला तिला खेळाचा सराव करण्यासाठी मुलांच्याबरोबर कुस्ती खेळावी लागली. त्यावेळी काही नातेवाइकांनी त्यांच्याही बोलण्याचे, व्यवहार करण्याचे टाळायला सुरुवात केली होती. समाजामध्ये वावरत असताना मुलीचे लग्न १८ व्या वर्षी केले पाहिजे अशी काहीशी संकल्पना आहे. मात्र, या संकल्पानेला फाटा देत कुटुंब तिला खेळत राहण्यासाठी बाजूने उभा राहिले. सुरूवातीला काहींना हे रुचले नाही. मात्र, तिची आवड लक्षात घेऊन मग समाजाने ते स्वीकारले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा द्याव्यात यावर ती म्हणाली की, सरकारने आमच्या सारख्या लहान शहरांत क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. कर्जत येथे कुस्ती खेळाची क्रीडा सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ती मुलांच्यासाठी आहे. मी दीड वर्षापासून तिथे प्रॅक्टीस करत आहे. ग्रुपमधील बर्‍याच मुली माझ्यासोबत होत्या. मात्र. त्यांना कौटुंबिक पाठिंबा मिळाला नाही आणि या खेळमध्ये कौटुंबिक पाठिंब्याशिवाय काही करणे अशक्य आहे.

संपादन : गणेश शिंदे (सरकार)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here