वाचा मुलीने बाबांना लिहिलेले महत्वाचे पत्र; वाचून नक्कीच डोळे पाणावतील

कृष्णा गणपत साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या मुलीची भावनिक फेसबूक पोस्ट आज मोठ्या संखेने व्हाईरल होत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. साहिर साबळे हे कवि, गीतकार, गायक, ढोलकी वादक, दिग्दर्शक, अभिनेते, अशी त्यांची विविध कला क्षेत्रात कामगिरी आहे. त्यांचे “गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलगी वसुंधरा साबळे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.

त्या लेखात त्यांनी लिहिले आहे की, प्रिय बाबा, लिहायला सुरवात तर केलीय मी पण काय लीहू? माझ्या पुरता विचार केला तर तुमचा माझ्यावर कीती पराकोटीचा पगडा होता. आजही आहे हे कुणालाच खर वाटणार नाही.. महाराष्ट्रासाठी तुम्ही शाहीर होतात पण माझ्यासाठी तुम्ही आई आणि बाबा असे दोन्ही होतात.. मी कधीच विसरु शकले नाही तुम्ही आई बनून केलेली माझी सेवा.. माझ्यावर तुमच खास प्रेम होत कारण मी आईसारखी दिसते. पण, माझ तुमच्यावर खास प्रेम कशासाठी होत? तुम्ही दौऱ्यावरुन आलात की रोज तुमचे पाय दाबत बसायला मला फार आवडायच.. तुमचा डोळा लागेपर्यंत रोज न सांगता मी ते करत रहायची.. मला काहीही मागायच नसायच तुमच्याकडे पण आत्मीक समाधान खूप वाटायच..

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

एकदम भावनिकदृष्ट्या लिहिलेली ही पोस्ट अनेकांना आवडत आहे. त्यात त्यांनी पुढे लिहिले आहे की, मी पुण्याला होस्टेलला रहायला गेले आणि तुम्ही मला रोज दिसणार नाही म्हणुन इतकी कासावीस झाले की अगदी कळत वय असुनही रोज हमसुन रडत बसायचे..मुंबईत आले की परत नीघताना मला रडताना बघून बाहेर नीघालेले तुम्ही थांबलात, माझ्या जवळ येऊन बसलात आणि म्हणालात ” वसु कुणावर इतकही प्रेम करु नये की त्याच जाण सहन होणार नाही..” मला नाही पटल तुमच बोलण आणि मी रडण कधीच थांबवल नाही शेवटी मला कायमच परत बोलावून घेतलत तुम्ही. बाहेर कीतीही मानमरातब मीळवत असलात तरी तुम्ही खरे संसारी होतात..घर टापटीप स्वच्छ दिसायलाच हव हा तुमचा अट्टाहास असे..कचरा काढला की म्हणायचात ” बघ घरावरुन हात फीरला की कीती प्रसन्न वाटत..” बेडवर तुमच्या समोर बेडशीट घालण ही मला अक्षरशः शिक्षा वाटायची..बेडशीटवरच डिझाईन एकसारख दिसलच पाहीजे, बेडवर एकही चुणी पडता कामा नये हे तुम्ही इतक बारकाईने बघायचात की तो मेळ जमवताना आमची दमछाक व्हायची..

बाप म्हणुन वयात येणार्या मुलींशी तुम्ही कठोर कधीच वागला नाहीत पण बेशीस्त वर्तनही कधीच खपवून घेतल नाहीत…आमच्या मीत्रांचे फोन आल्यावर ते सहज तुम्ही आमच्या हातात देऊन तीथुन नीघून जात होता पण रात्री उशीरा बाहेर थांबायची तुम्ही कधीच परवानगी दिली नाहीत..तुमच्या नजरेतच इतकी जरब होती की तशी आमची कधी हिम्मतही झाली नाही..

  त्यांच्या बाप म्हणून वाटणाऱ्या प्रेमाविषयी म्हटले आहे वसुंधरा ताईंनी म्हटले आहे की, बाप म्हणुन तुम्ही जे जे केलत त्याची अल्पशी उतराई आम्ही ” लोकधारा ” निर्माण करुन केली.. तुम्ही लोककलाकार होतात त्यामुळे स्वताच आयुष्य तुम्ही रेखीवपणे चीतारुन कुणाही लोककलाकाराला जमल नाही इतक स्थैर्य तुमच्या कलेच्या जोरावर तयार करुन ठेवलत पण वयाच्या साठी नंतर तुमच्या जगण्याची प्रेरणा ” लोकधारा ” झाली.. कधीच मीळाल नव्हत ते आर्थीक स्थैर्य लोकधाराने तुम्हाला दिल..ही फक्त आम्ही मुलींनी तुमच्या वरच्या प्रेमाची केलेली परतफेड होती.. तुमच म्हातारपण त्याच इतमामाने घालवणारी काठी बनली लोकधारा याच समाधानच आहे. पण तुम्ही जे मुंबईत निर्माण करुन ठेवल होतत तीतकही तुमच अडनाव मीरवणार्यांना टिकवता आल नाही हे दुर्दैव… मुंबईत तुम्ही सडाफटींग आलात आणि स्वताचा आशीयाना चढत्या क्रमाने वाढवत नेलात.. आज तुम्ही जाऊन पाचच वर्ष होतायत पण तुमच्या पुढच्या पीढीने तुमच नावनीशाण मुंबईतुन पुसून टाकलय.. आम्ही फक्त बघत बसलो कारण हे सगळ संपल्यावर आम्हाला समजलय.

  शाहीर आपल्या या लाडक्या लेकीला वसू असे लाडाने म्हणायचे. त्यांच्या लाडक्या वसुधाताई म्हणतात की, मी तुम्हाला दु:ख व्हाव म्हणून नाही लीहीत हे पण जीव तुटतोय रोज..तुम्ही दोन्ही कवेत घेऊन माणस जपलीत आणि नंतर माणसांना तुमचे दरवाजे कायमचे बंद केले गेले त्यात आम्हीही होतोच..पण आम्ही आणि आमची मुलं तुमच नाव संपू देणार नाही..मुलींना हक्क नसतो ना वारसा चालवायचा पण आम्ही आणि आमची मुलच तुमचा वारसा अखंड चालवत राहू……मनात खुपकाही साठलय..आज थोडस बोलून टाकल..तुम्हालाही सगळ समजतच असेल…म्हणुनच हे धाडस केल..कधीतरी वास्तवाला उघडं करावच लागेल बाबा..

  संपादन : गणेश शिंदे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here