धक्कादायक : PM मोदींचे खातेही झाले हॅक; केली होती बिटक्वॉइनची मागणी

पाठीमागे जगभरातील प्रमुख नेत्यांचे आणि उद्योगपती यांचे ट्विटर खाते हॅक करून बिटक्वॉइनची मागणी केल्याची बातमी आली होती. आता त्याच सायबर चोरांनी थेट आपला मोहरा भारताकडे वळवला होता. या भामट्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच खाते खाते हॅक करून बिटक्वॉइनची मागणी केली होती.

फायनान्शियल एक्प्रेस या वृत्तपत्राने ऑनलाईनमध्ये ही ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल वेबसाईटला जोडलेले narendramodi_in हे खाते हॅक केले गेले होते. पंतप्रधान रिलीफ फंड यामध्ये थेट बिटक्वॉइन देण्याची मागणी त्यावरून करण्यात आलेली होती. एकूणच सायबर भामटे कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीच्या खात्याला आणि कोणत्याही माहितीला हॅक करू शकतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत ट्विटरने हे काबुल केले होते. त्यांनी त्यावेळी म्हटले आहे की, इतरांच्या खात्यासह या मंडळींनी पैशांसाठी थेट मोदीजी यांच्याही खात्याला हॅक करून टाकले होते. मात्र, नंतर लक्षात आल्यावर तातडीने हे खाते रिकवर करण्यात आले. त्या खात्याला सुमारे २५ लाख फॉलोअर्स आहेत. अशा पद्धतीने सायबर भामट्यांनी भारतातील जनतेला लक्ष्य करून बिटक्वॉइन चोरण्याचा खेळ केला होता.

भारतात बिटक्वॉइनला अजूनही राजमान्यता नाही. तरीही काही महाभाग सरकारी यंत्रणेच्या नियमांना फाटा देऊन त्यात गुंतवणूक करीत आहेत. पैशांच्या लालसेपोटी असा खेळ करणारे मग अनेकदा फसतातही. असाच प्रकार बिटक्वॉइनच्या बाबतीत होऊ शकतो. काही देशांनी याला मान्यता दिल्याने आपल्याकडेही मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेकजण बिटक्वॉइन सांभाळत आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here