कंगनामुळे ‘आमची मुंबई’ ट्रेंडमध्ये; थेट ‘पीओके’शी तुलना केल्याने संतापला महाराष्ट्र

मुंबई मेरी जान असे म्हणत तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे कोट्यवधी नागरिक मुंबईत आणि मुंबईच्या बाहेरही आहेत. स्वप्नांची नगरी असलेल्या याच शहराला थेट पाकिस्तान ओक्युपाईड काश्मीरशी तुलना करून प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावत यांनी नवा वाद उभा केला आहे. मात्र, त्यामुळे ट्विटरवर आमची मुंबई नावाचा ट्रेंड आहे.

अभिनेत्री असलेल्या कंगना यांनी वेळोवेळी भाजपच्या विरोधातील पक्षांवर तोंडसुख घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचा गाढा विश्वास आहे. मात्र, त्याचवेळी मग मोदींच्या धोरणांना किंवा विचारणा विरोध करणारे या अभिनेत्रीला थेट पाकिस्तानी वाटतात. आताही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचा आरोप करून कंगना हिने आपल्याला त्रास होत असल्याचे म्हटले आहे. इतपत कदाचित ते सगळे योग्यही वाटले असते. कारण, त्रास झालाय तर तिने अशी मागणी करणे आणि न्याय मागणे योग्यही आहे. मात्र, त्याचवेळी नेहमीप्रमाणे वाद ओढवून घेण्याची सवय असलेल्या कंगना यांनी मुंबईत ‘पीओके’सारखा फील येतो असे ठोकून दिले आहे.

एकूणच सध्या देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याच्या बातम्या येत असतानाच सीमेवर तणाव आहे. त्यातच बिहारच्या निवडणुका आहेत आणि मुख्य म्हणजे आत्महत्या केलेल्या सुशांत सिंग याचा मुद्दा आता मागे पडत आहे. अशावेळी इलेक्ट्रोनिक माध्यमांना कंगनाने नवीन मुद्दा दिला आहे. जर तिला अशी धमकी आलेली होती तर रीतसर कारवाई करण्यासाठीची मागणी करणे आवश्यक होते. मात्र, मुंबई पोलिसांची भीती वाटत असलेल्या कंगना हिने थेट राऊत यांच्यावर आरोप करताना ‘पीओके’शी तुलना केल्याने मुंबईवर प्रेम करणाऱ्यांचा संताप अनावर झालेला आहे. अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here