महाराष्ट्राचा विकास फ़क़्त भाजपच करू शकते; आंबेडकर यांना विश्वास

अहमदनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने होत आहे. याच विकासाला महाराष्ट्र राज्यात गती देण्यासाठी पुन्हा एकदा भाजपची सत्ता गरजेची आहे. जनतेलाही आत याचे महत्व पटले आहे. त्यामुळेच भविष्यात लवकरच राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा विश्वास सरचिटणीस जगदीश आंबेडकर (भाळवणी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी व्यक्त केला आहे.

पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जगदीश आंबेडकर यांना तालुका सरचिटणीस पदावर नियुक्ती मिळाली आहे. त्यानंतर भाळवणी येथे बोलताना त्यांनी हे मत मांडले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अभ्यासू आणि निस्वार्थी नेतृत्वाची गरज आहे. आताच्या महाविकास आघाडी सरकारकडून अजिबात अपेक्षांची पूर्तता होणार नसल्याचे जनतेला पटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार हे निश्चित.

भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका युवा मोर्चाची कार्यकारिणी तालुकाध्यक्ष वसंत चेडे व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास रोहोकले यांनी जाहीर केली. निवड झालेल्या सर्वांचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे , माजी जिल्हाध्यक्ष आणि मार्गदर्शक प्रा. भानुदास बेरड सर, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा युवक अध्यक्ष सत्यजित कदम, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादन : विनोद सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here