फॉच्यूनच्या लिस्टमध्ये अंबानी पुत्रांसह बायजू, पूनावाला यांच्यासह सातजण भारतीय

जगप्रसिद्ध Fortune नावाच्या मासिकाने आणखी नवीन यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी आहे ४० वर्षे वयाच्या आतील जगभरातील ४० प्रभावशाली व्यक्तींची. होय, ही यादी सेक्टरनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अंबानी पुत्र-पुत्री यांच्यासह एकूण सात भारतीय तरुणांनी स्थान मिळवले आहे.

फायनान्स, टेक्नोलॉजी, हेल्थकेअर, पॉलिटिक्स आणि मिडिया & इंटरटेन्मेंत अशा पाच सेक्टरमधील युवा आणि प्रभावशाली वाटणाऱ्यांची यादी यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूणच यामध्येही भारतीयांनी आपली छाप सोडली आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जुळे पुत्र-पुत्री असलेल्या ईशा आणि आकाश अंबानी यांनीही यामध्ये स्थापन मिळवले आहे. वडिलांच्या रिलायन्स कंपनीत संचालक मंडळात काम करताना फेसबुक आणि गुगल यांच्याकडून गुंतवणूक मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची त्यामध्ये प्रशंसा करण्यात आली आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

तसेच या दोघा रईसजाद्यांसह या यादीत Serum Institute of India चे अदार पूनावाला, सॉफ्टबँक ग्रुपचे सीनियर वाइस प्रेसिडेंट (इन्वेस्टमेंट्स) अक्षय नाहेता, Maverick Ventures कंपनीचे एमडी अंबर भट्टाचार्य, PharmEasy याचे फाउंडर धवल शाह व धर्मिल शेठ, Byju’s चे फाउंडर बायजू रवीन्द्रन आणि शाओमी इंडियाचे मनु कुमार जैन यांचीही नावे या यादीत आहेत.

यापैकी बायाजूचे रवीन्द्रन यांनी त्यांची कंपनी सध्या शैक्षणिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी केल्याबद्दल कौतुक केलेले आहे. तर, शाओमी मोबाइल भारतीयांच्यामध्ये लोकप्रिय करून मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचे कौशल्य मिळवलेल्या मनु कुमार जैन यांचेही विशेष कौतुक करण्यात आलेले आहे. मनु कुमार जैन यांनी यापूर्वी जबॉन्ग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची स्थापना करून लोकप्रिय केले होते. पुढे ही कंपनी फ्लिपकार्टने अधिग्रहित केली.

संपादन : सचिन मोहन चोभे

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here