फ़क़्त ‘आरे’ला कारे केले नाही, तर करूनही दाखवले..!

मुंबई :

ऐन विधानसभा निवडणुकीत आरे येथील वनसंपदा तोडण्याचा प्रकार घडला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि मेट्रो प्रशासनाने ते कृत्य कसे पर्यावरण विरोधी नाही याची भलामण केली होती. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील पर्यावरणवाद्यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने हे जंगल वाचवण्याची भूमिका घेतली होती. त्याच्यावर महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.

महाराष्ट्रातील सामान्य जनतेने आणि मुंबईकरांनी याचे उत्साहात स्वागत केले आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आरेच्या जंगलाविषयी एक महत्वपूर्ण ट्विट केले आहे. त्यांनी मागच्या सरकारची पिसे यामधून काढली आहेत.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

“मित्रहो….. आम्ही दिलेला शब्द जपला…. आरे चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला अभिनंदन आपणा सर्वांचे #संघर्षाचा विजय”, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने आरेच्या जंगलाची ६०० एक्कर जमीन ही जंगल आरक्षित क्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली.  एकूणच या दोन्ही राजकीय पक्षांनी या महत्वाच्या मुद्यावर फ़क़्त राजकीय आरे-कारे केलेले नाही, तर थेट ठोस निर्णय घेतला आहे. सध्याच्या पर्यावरण संवर्धनाच्या दुर्लक्ष करण्याच्या काळात सरकारमधील जबाबदार घटक घेत असलेली ही भूमिका महत्वाची आहे.

संपादन : गणेश शिंदे (सरकार)

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here