कांद्याचे भाव स्थिरावले; पहा महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये मिळतोय जास्त भाव ते

पुणे :

देशभरात जास्त पावसामुळे यंदा खरीपातील लाल कांदा खराब होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचवेळी चाळीत पडून असलेला उन्हाळी ककांदाही जास्त आर्द्रता असल्याने सडण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी आता बाजारात कांद्याचे भाव सरासरी १२ ते १४ रुपये किलो या पट्ट्यात स्थिरावले आहेत.

राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सेन्सेटिव्ह पिक असलेल्या कांद्याला मागील वर्षभरात चांगला भाव मिळालेला नाही. भाव वाढत नसल्याने कांदा चाळीत पडून होता. हाच कांदा आता खराब होण्यास सुरुवात केल्याने चाळीतून बाहेर आणला जात आहे. परिणामी सध्या कांद्याचे भाब्व बाजारात स्थिरावले आहेत. मात्र, पुढील कालावधीत हेच भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कांद्याच्या भावात किमान प्रतिकिलो ४-५ रुपये वाढीचा अंदाज आहे. मात्र, सध्याचा खराब होण्याच्या मार्गावरील असलेला कांदा संपल्यावरच भाव वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणजे आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

बुधवारी (दि. २ सप्टेंबर २०२०) महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील गेड वन दर्जाच्या कांद्याचे सरासरी भाव (आकडेवारी प्रतिक्विंटल रुपयांमध्ये) असे : कोल्हापूर १२००-१६००, औरंगाबाद ११००-१२००, मुंबई १४००-१८००, सातारा १२००-१२५०, सोलापूर १०००-१३००, जळगाव १०००-१३००, नागपूर ९००-१०००, सांगली १०००-१४००, पुणे (खडकी) ११००-१०५०, येवला १६००-१७५०, लासलगाव १६००-१७००, कळवण १५००-१७००, मनमाड १५५०-१७००, पिंपळगाव बसवंत १४००-१७००, देवळा १३००-१६५०, राहता १५००-१६०० आदि.

संपादन : सचिन पाटील

स्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here