हे पत्रकारितेचेही अपयश नाही का; रायकरांच्या निधनानंतर महेश जगताप यांनी लेखात काय म्हटलेय पहा

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे पुणे येथील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे करोनामुळे निधन झाले. त्यानंतर अनेक प्रश्न पत्रकारांच्या मनात येत आहेत. महेश जगताप या युवा पत्रकारानेही त्याला पडलेला गंभीर प्रश्न मांडला आहे. त्यांचा सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला लेख आम्ही जसाच्या तसाच प्रसिद्ध करीत आहोत.

पुण्यातील एकाही पत्रकाराला रायकर यांच्यासाठी बेड उपलब्ध करता येऊ नये हे पत्रकारितेचे अपयश नाही का…. पत्रकारिता क्षेत्रातील tv9 चे बातमीदार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले. बातमी समजल्यानंतर मला प्रश्न पडला हा माणूस पत्रकार असताना सुद्धा त्याला व्हेंटिलेटर बेड मिळू शकला नाही. व्हेंटिलेटर मिळण्यासाठी पत्रकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले असणार यात काही वादच नाही. यामध्ये एबीपी माझा, टीव्ही नाईन, साम, सकाळ, सामना, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत या संस्थेतील अनेक पत्रकारांनी रायकर यांना मदत मिळवण्यासाठी मदत केली असणार.

पण दुर्दैवाने त्यांना एक साधा ऑक्सिजन बेड मिळवता आला नाही. मला प्रश्न पडला आहे .जर आपनाला व्यवस्थेवर आपला कंट्रोल आहे किंवा आपण व्यवस्था बदलू शकतो हा आत्मविश्वास आहे तर साधा आपल्याला एक बेड मिळवता न येणे, हे म्हणजे दुर्दैव नाही का….म्हणजे किती आभासी जगात आपण जगतोय .यातून आपली किती ताकद आहे हे लक्षात येते . बऱ्याच वेळा आपले ओळखीचे अधिकारी ,राजकारणी असल्याने त्यांच्या चुका होत असतानाही आपण फक्त ओळख आहे ,काहीतरी मदत करतो या नावाखाली सोडून देतो पण त्याच वेळी त्याचा योग्य बंदोबस्त केला असता तर आज अशी परिस्थिती आपल्या पत्रकार मित्रावर आली नसती. आपली व्यवस्थेवर हुकमत राहिली असती जर आपण सर्व क्षेत्रातील बतमीदारांनी तोडजोड न करता बातमीदारी केली असती तर .

लेखक : महेश जगताप (मो. 8698570073)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here