धक्कादायक : चीनमधून आली आणखी एक बेक्कार बातमी; पहा काय म्हटलेय पेंटागॉनने

भारताचा कुरापतखोर शेजारी असलेल्या चीनची मुजोरी दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. या देशाने हुकुमशाही पद्धतीने तेथील सामन्यांचा आवाज तर दाबला आहेच. आता उग्र राष्ट्रवाद पेरतानाच जगाला झटका देण्याच्या अनुषंगाने थेट शस्त्रास्त्रे वाढवण्याची तयारी केली आहे.

अमेरिकेच्या लष्करी मुख्यालायाने एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात पेंटागॉनने म्हटले आहे की, भारताला अडचणीत आणण्यासाठी चीनने पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या तीन देशांमध्ये लष्करी तळ उभारले आहेत. आता पुढील काळात भारतावरील दबाव वाढवण्यासाठी या देशाने थाईलैंड, सिंगापुर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमीरात (UAE), केन्या, सेशल्स, तंजानिया, अंगोला आणि तजाकिस्तान या देशातही आपले लष्करी तळ उभारण्याची तयारी केली आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

Military and Security Developments Involving The Peoples Republic of China 2020 या रिपोर्टमध्ये हे महत्वाचे वास्तव मांडण्यात आलेले आहे. त्यात म्हटले आहे की, भारताला त्रास देण्यासह अमेरिकेला लष्करी टक्कर देण्याचाही विचार करून चीनने अण्वस्त्रांची क्षमता वाढवण्याची तयारी केली आहे. गोपनीय पद्धतीने चीनने हा कार्यक्रम आखला आहे. सध्या असलेल्या क्षमतेच्या दुप्पट अण्वस्त्रांची क्षमता वाढवण्यासाठीचे प्रयत्न हा देश करीत आहे. एकूणच आर्थिक जोरणार आता जगभरात आपला दबदबा निर्माण करणारा चीन पुढील काळात अनेक देशांच्या संरक्षणासाठीची डोकेदुखी ठरणार आहे. अमेरिकेलाही आता चीनच्या या एकूण वाढत्या लष्करी ताकदीची धास्ती पडलेली आहे. अर्थव्यवस्था मजबूत करून मग जगावर धाक दाखवण्याची ही चीनची खेळी असल्याचे जगभरातील तज्ञ सांगत आहेत.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here