Breaking : म्हणून मोदींच्या ‘आरोग्य सेतू’ला मेट्रोने नियमातून वगळले..!

कोणत्याही सरकारी योजनेसाठी किंवा अगदी बँकेमधेही आरोग्य सेतू नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन अनिवार्य करण्याचा प्रकार देशभरात चालू आहे. जनतेची मानसिकता किंवा त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या सेवा घेण्यासाठी काही तयारी आहे किंवा नाही याचा काहीही विचार न करता हे अॅप्लिकेशन म्हणजेच करोनाला रोखण्याचा उपाय असे चित्र रंगवले जात आहे. मात्र, दिल्ली मेट्रोने हे अॅप्लिकेशन वापरण्याची सक्ती नसल्याचे जाहीर केले आहे.

दिल्ली मेट्रो सेवा सुरू करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार यापुढे मास्क लावण्यासह प्रत्येक प्रवाशांमधील अंतर ६ फुट ठेऊन ही सेवा चालू होत आहे. तसेच आजारी माणसांना अजिबात मेट्रोमध्ये प्रवेश न देण्याचाही नियम जरी करण्यात आलेला आहे. दिल्लीत आता काही प्रमाणात का होईना ऑफिस आणि इतर सेवा खुल्या होत आहेत. अशावेळी नागरिकांना प्रवासात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन मेट्रो सेवा सुरू होत आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

त्यावर माहिती देताना अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, नियम आणि सर्व काळजी घेऊन माही ही सेवा सुरू करीत आहोत. आरोग्य सेतू हे अॅप्लिकेशन अनिवार्य केलेले नाही. अनेकांकडे स्मार्टफोन नसतात. अशा गरीब प्रवाशांना आम्ही त्या एका नियमासाठी प्रवासाच्या सेवेपासून वंचित ठेऊ शकत नाहीत.

एकूणच उठसूट आरोग्य सेतू या अॅप्लिकेशनचा जाप करणाऱ्या कोडग्या व्यवस्थेतही काही अधिकारी किंवा यंत्रणा सामान्य माणसाच्या अडचणी लक्षात घेऊन काम करणाऱ्या असतात याचीच प्रचीती यानिमित्ताने दिल्ली मेट्रो सेवेने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वापरायला सांगितल्यावर अनेक ठिकाणी त्याची सक्ती केली जात आहे. मेट्रो अधिकाऱ्यांनी मात्र त्याचे योग्य ते भान राखले आहे. हे विशेष..!

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here