देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना आता या सेवाभिमुख आणि उद्योगाभिमुख बनलेल्या अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. होय, सध्या सगळे सेक्टर वजावटीत असतानाच फ़क़्त एकच सेक्टर सुस्थितीत आहे. ते एकमेव सेक्टर म्हणजे अॅग्रिकल्चर सेक्टर. त्याच्याकडून आता देशातील शेअर बाजाराला आणि अर्थतज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या मंडळींनाही मोठी अपेक्षा आहे.
करोनाच्या संकटात शहरी भागाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. त्या तुलनेत ग्रामीण भागाला मात्र तितकासा परिणाम झालेला नाही. शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळातही शेतीमध्ये जोमाने काम केले. समवेत मॉन्सूनचा पाउस वेळेवर आणि मुबलक झाल्याने पिके तरारली आहेत. उलट काही भागात जास्त पावसाने खरीपाची पिके धोक्यात आलेली आहे. अशावेळी दुचाकी, ग्राहकोपयोगी उपकरणे, ग्रोसरी (किराणा) आणि ट्रॅक्टर व शेतीसाठीची यंत्रसामुग्री यांच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे. त्याने जीडीपीला मोठा आधार मिळाला आहे.
ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स
मागील १२० वर्षांचा पावसाचा डेटा पाहिल्यावर यंदा एकदम जास्त पाउस झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याने शेतकऱ्यांच्या हातात पुढील काळात चांगला पैसा खुळखुळ करण्याची शक्यता वाटत आहे. परिणामी ग्रामीण भागात अनेक उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत. फॉर्चून फिस्कल कंपनीचे डायरेक्टर जगदीश ठक्कर यांनी म्हटले आहे की, पुढील काळात ग्रामीण भागात वित्तसंस्था आणि बँक यांच्या कर्जालाही मागणी वाढेल.
एकूणच कन्झुमर, फायनान्स, ऑटो आणि अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये येणाऱ्या तेजीचा हा फायदा शेअर बाजारावरही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कावेरी सीड्स, हिरो मोटारकॉर्प, एस्कॉर्ट लिमिटेड, आयशर मोटर्स, कोरोमंडल इंटरनॅशनल यांच्या शेअरमध्ये २१ ते ४३ टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज ब्रोकरेज फर्मने जाहीर केला आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.
+++++
शेती-मातीची माहिती आणि इतर अपडेटसाठी पुढील ठिकाणी आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा
फेसबुक पेज (वाचणे) : कृषीरंग Krushirang
युट्युब चॅनेल (पाहणे) : KrushiRang Live
Khabri चॅनेल (ऐकणे) : Krushirang Marathi | कृषीरंग
ता.क. : कृषीरंगवर तुमची संस्था, फर्म, कंपनी, उत्पादने किंवा कार्यक्रमाची बातमी आणि जाहिरातीही आम्ही प्रसिद्ध करतो. त्याबाबतच्या ब्रँडिंग व प्रमोशनसाठीच्या माहितीसाठी आम्हाला ९४२२२१५६५८ यावर मेसेज (व्हाटस्अॅप / टेक्स्ट) किंवा krushirang@gmail.com या इमेलद्वारे संपर्क करा.