व्हाट्सअॅप घेऊन येत आहे दोन खास फिचर; वाचा त्याचे महत्व आणि उपयोग

व्हाट्सअॅप हे पर्सनल मेसिजिंग मोबाईल अॅप्लिकेशन अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. मनोरंजन आणि माहिती घेण्यासह अनेकजण आत आयचा बिजनेससाठीही वापर करीत आहेत. अशावेळी आता ग्राहकांना जखडून ठेवताना त्यांना मेसेजिंगचा आनंद वाढवून देण्यासाठी या अॅप्लिकेशनवर आणखी दोन नवे फीचर्स जोडले जाणार आहेत.

होय, सगळ्यांना वापरण्याजोगे आणि महत्वाचे म्हणजे उपयोगी असणारे असे हे फिचर असतील. ज्यामध्ये आपण सगळे अॅप्लिकेशनवर चाट करताना वापरू शकतो. पहिले फिचर आहे ते म्हणजे वॉलपेपरचे. होय, व्हाट्सअॅप वॉलपेपर नावाचे नवे फिचर आताच्या अॅप्लिकेशनवर आपण सगळे वापरू शकणार आहोत. त्यासाठी व्हाट्सअॅप वॉलपेपर एक नवे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. तेच आपल्या आताच्या अॅप्लिकेशनमधून वापरता येईल. त्याद्वारे आपण इतरांना मेसेज पाठवताना समवेत आपल्याला पाहिजे तो वॉलपेपर जोडू शकणार आहोत.

तर, दुसरे एक फिचर सर्वांसाठी येत आहे ते म्हणजे आपल्या व्हाट्सअॅप चाटची हिस्टरी वेगवेगळी ठेवणे. सध्या सगळे फोटो, व्हिडिओ आणि मेसेज एकत्रित असतात. त्यामुळे मोबाइलचा डाटा भरून जातो. अशावेळी मग कोणते डिलीट करायचे आणि कोणते ठेवायचे हेच समजत नाही. यासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागतो. अशाच त्रासाला फाटा देण्यसाठी यापुढे आपण पाठवलेले, फ़क़्त फोरवर्ड केलेले आणि आलेले असे वेगवेगळे फोल्डर आपणास दिसतील. त्याद्वारे आपण सगळेजण मग नेमके कोणते डिलीट करायचे आहे ते एकाच झटक्यात क्लीन करून मोबाइल साफ करू शकतो. अजूनही हे दोन्ही फिचर पूर्णपणे सुरू झालेले नाहीत. एकदा सुरू झाले की ते सर्वांसाठी खुले असतील अशी माहिती कंपनीने दिली आहे.

संपादन : संचिता कदम

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here