‘त्यावेळी’ चीनचे ८० सैनिक मारले गेले होते; पहा Weibo वर काय व्हायरल होत आहे ते

चीन्यांनी दम खाल्ल्यासारखे भासवून पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसण्याचे अपयशी प्रयत्न केल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचवेळी दि. १५ जून २०२० रोजी रात्री झालेल्या भारत-चीन सैनिकांच्या रेटारेटीत तब्बल ८० चीनी सैनिक मारले गेल्याचे फोटो Weibo या चीनमधील ट्विटर मानले जाणाऱ्या वेबसाईटवर व्हायरल होत आहे.

लडाखमधील हिंसक घटनेत भारतीय सैन्याने आपले २० मोहरे गमावले होते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. अशावेळी चीनच्या नेमक्या किती सैनिकांचा त्या घटनेत मृत्यू झाला हेच चीनी सरकार किंवा नैण्याने जाहीर केले नव्हते. उलट आमचे एकहीजण मारले गेले नसल्याचा दावा चीन्यांनी केला होता. मात्र, आता Weibo  वर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि माहितीमुळे चीनची पोलखोल झाली आहे. त्या घटनेत चीनचे ८० सैनिक मारले गेल्याचा दावा व्हायरल फोटोमध्ये केला जात आहे.

नवभारत टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने ही ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, त्या रात्रीच्या घटनेत भारतचे २० जवान शहीद झाले होते. मात्र, चीनने कोणतीही आकडेवारी न देता यावर चुप्पी साधली होती. अशावेळी पुन्हा एकदा चीनचे सैनिक आगळीक करून भारतीय सीमेच्या आत घुसत असल्याची बातमी आलेली आहे. अशावेळी असेही फोटो व्हायरल होत आहेत की, त्या रात्रीच्या हिंसक घटनेत भारताच्या सैनिकांनी चीनच्या ८० जवानांना गारद केले होते. एकूणच चीनी हुकुमशाहीने कितीही माहिती दडवण्याचा प्रयत्न करू देत सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here