रोहित पवारांनी वेधले ‘त्या’ महत्वाच्या मुद्याकडे लक्ष; पहा काय आवाहन केलेय गृहमंत्र्यांना

करोनाच्या आपत्कालीन कालावधीत देशभरातील गरीब जनता आर्थिकदृष्ट्या पिचली आहे. कोणतेही इन्कम नसल्याने अगोदरच जगण्याची भ्रांत असलेल्या गरीब, कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबातील महिला व पुरुष यांचाकडे सध्या फायनान्स कंपन्यांनी तगादा लावला आहे. अनेकांनी गुंड पाठवून वसुलीसाठीची कारवाई सुरू केली आहे. याच महत्वाच्या मुद्द्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे.

त्यांनी याबाबत ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, कर्जाच्या हप्त्यासाठी सवलत देऊनही काही खासगी वित्तीय संस्था वसुलीचा तगादा लावतायेत. त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून कर्जदारांना धमकावण्याचेही प्रकार होत असल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयी दहशत आहे. याबाबत गृहमंत्री  @AnilDeshmukhNCP साहेब आपण दखल घ्यावी, ही विनंती.

सध्या ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि शेतकरी गटांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थकले आहेत. त्यावर संबधित कंपन्यांनी चक्रवाढ व्याज लावलेले आहे. एकतर अगोदरच १८ ते २४ टक्के इतक्या तगड्या व्याजाच्या दराने या स्मॉल फायनान्स कंपन्या किंवा वित्तसंस्था कर्ज देत आहेत. त्यातच त्यांनी चक्रवाढ व्याज लावून आणखी ओरबाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्ज घेतलेल्या सर्वांना संध्या खासगी सावकारीपेक्षाही वाईट अनुभव येत आहेत.

याच महत्वाच्या प्रश्नाकडे रोहित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा महिला व कुटुंबियांना आधार देण्यसाठी कारवाई अपेक्षित आहे. गुन्हेगारी मंडळी थेट घरामध्ये जाऊन त्रास देत असतानाही राज्यातील पोलीस यंत्रणा झोपलेली असल्याचाच मुद्दा रोहित पवार यांनी मांडला आहे. एकूणच यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेली एकूण परिस्थिती त्यांनी अधोरेखित केल्याची चर्चा आके.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here