वॉलमार्ट खरेदी करणार रिलायन्समध्ये हिस्सा; पहा नेमके काय घडू शकते बाजारात ते

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी जोरात आहे. त्यांनी नुकतीच फ्युचर गुपच्या रिटेलिंगवर कब्जा केला आहे. आता याचा जोरात निघालेल्या रिलायन्सच्या रिटेल डिव्हिजनमध्ये काही हिस्सा खरेदी करण्याची तयारी वॉलमार्ट या जगातील सर्वात मोठ्या कंपनीने केली आहे.

रिटेलिंग क्षेत्रातील बादशाह म्हणून वॉलमार्टची ओळख आहे. भारतात थेट येणे शक्य नसल्याने या कंपनीने फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करून पाय पसरले आहेत. मात्र, आता अंबानींच्या रिलायन्समध्ये काही हिस्सा खरेदी करून भारतात आपली गुंतवणूक वाढवण्यासाठी वॉलमार्ट सज्ज झाली आहे. मॉर्निंग कॉन्टेक्स्ट यांच्या माहितीनुसार असे स्पष्ट झालेले आहे की, रिलायंस रिटेल वेंचर्स (आरआरवीएल) मध्ये काही प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठीचा हा सौदा लवकरच होऊ शकतो.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

वॉलमार्ट ही जगामध्ये रिटेलिंग क्षेत्रामधील बलाढ्य कंपनी आहे. जर, त्यांनी रिलायन्स कंपनीमध्ये काही गुंतवणूक केली तर अंबानींच्या या कंपनीला आणखी मोठी ग्रीप मिळेल. अशा पद्धतीच्या मोठ्या कंपनीने गुंतवणूक केल्यावर संबंधित कंपनीची स्थिती आणखी मजबूत होते. गोल्डमैन सैक्स यांच्या अंदाजानुसार ज्या पद्धतीने मागील चार वर्षांमध्ये अंबानींची रिलायन्स कंपनी दुप्पट मोठी झाली आहे. ते पाहता पुढील कालावधीत टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रामधील आताची वाढ लक्षात घेता ही कंपनी आगामी काळात २०२५ पर्यंत आणखी आताच्याही दुप्पट मोठी होण्याचा अंदाज आहे.

एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेता रिलायन्सला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेले आहेत. परिणामी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याकडे वाटचाल करीत असतानाच या कंपनीत गुंतवणूक केलेल्या छोट्या-मोठ्या शेअरहोल्डरलाही याचा मोठा फायदा झाला आहे. एकूणच सगळीकडे विन-विन सिच्युएशन आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here