तर त्या रुग्णांना तुरुंगात पाठवा; मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

मागील सहा महिन्यापासून सुरू असलेला करोना विषाणूचा कहर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यामुळे एकूणच केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा नेमका काय फायदा झाला तेच कळेनासे झालेले आहे. अशावेळी जनतेमध्ये संभ्रम वाढत असल्याने आणि एकमेकांची काळजी घेण्याची भावना कमी पडल्याने करोना बाधित रुग्ण थेट मोकाट फिरताना दिसत आहेत. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अधिकाऱ्यांची बैठक घेताना दिलेले निर्देश त्यांनी ट्विटरवर टाकले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, स्वॅबचा रिपोर्ट येईतोपर्यंत घरातच राहण्याची सक्ती करा.. पॉझिटिव्ह रुग्ण घरातून / हॉटेलमधून उपचार घेणारा बाहेर दिसला तर तुरुंगात पाठवा.. कोल्हापूर, दि.३१: कोरोना हा रोग फक्त संसर्गामुळेच होतो. त्यामुळे नागरिकांनी फारच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. हातजोडून मी कळकळीची विनंती करतो.

एकूणच वाढती रुग्णसंख्या आणि त्यात नागरिकांचे मिळत नसलेले सहकार्य यामुळे करोना विषाणूचे रुग्ण आणखी वेगाने वाढण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी प्रशासन आणि एकूण व्यवस्था नेहमीप्रमाणे फ़क़्त पाहत आहे. अगोदर खूप कठोर असलेले प्रशासन आता नेहमीच्या थाटात मोकाट आहे. त्याचेवळी रुग्णही मोकाट झालेले आहेत. अशावेळी आता कोविड १९ ची साथ कशी रोखणार हाच मोठा प्रश्न बनला आहे. परिणामी मंत्री मुश्रीफ यांनी उद्वेगाने असे म्हटले आहे.

आता रुग्णांना थेट तुरुंगात पाठवायचे म्हटल्यावर त्यांना पकडताना पोलीस व इतरांनाही विषाणूची लागण होण्याचा मोठा धोका आहे. त्यासाठीची यंत्रणा, मनुष्यबळ आणि मोठा खर्च हाही मुद्दा होऊन बसणार आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here