होय, फ़क़्त ३.५० लाखांमध्ये घर; पहा कोणत्या शहरात आणि कसा मिळतोय या सरकारी योजनेचा लाभ

घर बांधणे किंवा विकत घेऊन त्यात राहणे हे माणसाचे महत्वाचे स्वप्न आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून फ़क़्त ३ लाख ५० हजार रुपयात शहरी भागात घर मिळणार आहे. या क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्कीमचा कालावधी पुन्हा एकदा ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

२५ जून, २०१५ पासून या योजनेतून देशभरात किमान अडीच लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती सरकारने जाहीर केली आहे. या योजनेत कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना आपले पहिले घर घेताना हे अनुदान दिले जाते. आजपासून या स्कीममध्ये उत्तर प्रदेश आवास विकास परिषद यांच्यातर्फे ३५०० घरांचे बुकिंग सुरू झाल्याची माहिती उत्तरप्रदेश सरकारने दिली आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून मैनपुरी, फतेहपुर, हरदोई, रायबरेली, मेरठ, कानपुर देहात, कन्नौज, उन्नाव, बहराइच, मऊ, बलरामपुर आणि बाराबंकी या शहरात घरांचे आवंटन केले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा :

https://pmaymis.gov.in/  या वेबसाईटवर नावनोंदणी करा.

आपली कॅटेगरी निवडा. LIG, MIG आणि EWS यापैकी एक, दोन किंवा तिन्हींची निवड करून पुढे जा.

आधार नंबर टाकून पुढे आधार नंबरवर असलेले नाव योग्य लिहा.

मग पुढील सर्व माहिती भरून दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

पुढे अर्जाची फी भरावी. हा अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे.

तर, बँकेत कर्जाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मग ५००० रुपये शुल्क आहे.

३ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक इन्कम असलेल्यांना या योजनेतून अनुदानाचा लाभ मिळतो. त्यासाठी आपणही आपल्या बिल्डरकडे याबाबतची मागणी करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरू शकता.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here