‘त्या’ ३०० % रिटर्नवाल्या शेअरमध्ये चुकूनही करू नका गुंतवणूक; पहा काय आहे कारण

शेअर बाजारात रात्रीतून श्रीमंत होण्यासाठी अनेकजण जबरदस्त रिटर्न देणाऱ्या मात्र वास्तवात काहीच ठीक नसलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, या गुंतवणुकीचा फायदा कमी आणि नुकसान होण्याची टक्केवारी जास्त असते.

होय, आताही मार्च महिन्यापासून देशाची अर्थव्यवस्था गंडलेली असतानाही सर्वच कंपन्यांचे शेअर जोरात वरच्या सर्किटला जाऊन धडकले आहेत. अशावेळी अनेकजण अशाच छोट्या किमतीच्या मात्र जोरदारपणे पैसे देणाऱ्या शेअरच्या नादी लागून गुंतवणूक करीत आहेत. मात्र, त्या शेअरमधून पैसे मिळण्याची शक्यता कमी असून झाला तर मोठा तोटा होऊ शकते असेच इकॉनॉमिक टाईम्स यांच्या बातमीत म्हटले आहे.

अशा सुमारे २० कंपन्या आहेत ज्यांच्या सलग पाच तिमाहीमध्ये त्यांना तोटा आलेला आहे. कागदोपत्री तोटा असतानाही शेअर बाजारात त्यांचे भाव मात्र जोमाने वाढत आहेत. त्यातील काहींनी २४ मार्च या शेरा बाजाराच्या घसरलेल्या आकड्यापासून २०० ते ३०० टक्के इतकी ग्रोथ दाखवली आहे. यामध्ये व्होडाफोन-आयडिया यांचाही शेअर आहे. त्याच्यामध्ये १६४ टक्के इतकी ग्रोथ झाली आहे. ही कंपनी संकटात असतानाच त्यांच्याकडे ग्राहकही नाहीत. तरीही ही मोठी वाढ होत आहे. हे नैसर्गिकरीत्या नसल्याने कधीही याचे भाव खाली येऊन मोठा फटका बसू शकतो. अबान ऑफशोर, जीटीएल इंफ्रा, एचसीएल इंफोसिस सिस्टम्स, इंडो रामा सिंथेटिक्स, रैम्की इंफ्रा सिंथेटिक, वर्धमान पॉलीटैक्स, बर्नपुर सीमेंट, टुटिकोरिन अल्काली केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स, अक्श ऑप्टिफाइबर्स आणि वेलस्पन स्पेशिलिटी सॉल्युशंस यांचाही यामध्ये समावेश आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here