गुड न्यूज : शेतकऱ्यांची करोना काळावरही मात; पहा काय केलीय इंडियन फार्मर्सने कमाल

भारताची अर्थव्यवस्था गंभीर टप्प्यावर आल्याची बातमी चर्चेत आहे. सध्या मागील तिमाहीत जीडीपीने थेट उणे २४ टक्क्यांपर्यंत मजल मारल्याने सार्वजन चिंता व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी शेती क्षेत्रात मात्र खऱ्या अर्थाने देशाला सुधारण्याची ताकद असल्याचे अधोरेखित होत आहे. पेरणीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्के वाढ झालेली असतानाच आता ट्रॅक्टर खरेदीमध्ये शेतकऱ्यांनी आपली छाप सोडली आहे.

करोना विषाणूची साथ, त्यामुळे होत असलेला कोविड १९ आजार आणि लॉकडाऊन यामुळे देशाचा जीडीपी पार ४० वर्षांमध्ये सर्वाधिक खोल गेला आहे. मात्र, त्याचवेळी भारत सरकार आणि एकूणच देशातील अर्थतज्ञ यांचे अजिबात विशेष लक्ष नसलेल्या शेती क्षेत्रात शेतकऱ्यांनी अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न केला आहे. मागील तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकासदर ३.४ टक्के इतका राहिला आहे. त्याचवेळी ट्रॅक्टर विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. ट्रॅक्टर विक्रीमुके एकूण ऑटो सेक्टरलाही सुखद धक्का बसला आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

ADVT : या ऑफरचा लाभ घेण्यासाठी https://amzn.to/3gONdMn या लिंकवर क्लिक करून पुढे जावे.

महिंदा & महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 65 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर, एस्कॉर्ट कंपनीच्या ट्रॅक्टरची विक्री तब्बल ८० टक्के इतकी वाढल्याचे स्पष्ट झालेले आहे. एकूणच लॉकडाऊन असूनही याच काळात या कंपन्यांनी मोठी ग्रोथ अचिव्ह केली आहे. ऑगस्ट महिन्यातही ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये तब्बल ७९ टक्के इतकी वाढ झालेली आहे. एकूणच ज्या क्षेत्राकडे एकूण देशाचे अजिबात लक्ष नाही त्याचे क्षेत्रामध्ये सध्या सुगीचे दिवस पुन्हा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीमधील ही वाढती गुंतवणूक खूप महत्वाची आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here