म्हणून चीन १९६२ प्रमाणेच करीत आहे कुरापती; पहा काय म्हटलेय NBT च्या न्यूज रिपोर्टमध्ये

आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी कोणतेही शासन राष्ट्रवाद या भावनेचा उपयोग करून घेते. आताही चीनचे सरकार १९६२ प्रमाणेच अडचणीत असल्याने पुन्हा भारताशी कुरबुरी करीत असल्याचे नवभारत टाईम्स या हिंदी माध्यमातील वृत्तपत्राने म्हटले आहे. त्यांनी यासाठी एक खास लेख प्रसिद्ध करून शक्यता कशी योग्य आहे हेच अधोरेखित केले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, १९६२ मध्ये माओ त्से तुंग यांच्या काळात अशीच परिस्थिती असताना चीनने भारताशी भांडण काढले होते. त्यावेळी युद्ध झाले होते. आताही त्यावेळी जशी खाण्याची वाईट परिस्थिती चीनमध्ये होती तेच चित्र आताही आहे. टोळधाड आणि महापूर यामुळे चीनमधील बहुसंख्या पिक खराब झालेले आहे. अशावेळी राष्ट्रपती क्षी जीनिपिंग यांनी किल्न युअर प्लेट या अभियानाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. हे अभियान म्हणजे ताटात अजिबात उष्टे अन्न न ठेवण्याचे अभियान आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

ADVT : या ऑफरचा लाभ घेण्यासाठी https://amzn.to/3gONdMn या लिंकवर क्लिक करून पुढे जावे.

हे अभियान सुरू असतानाच २०१९ मध्ये चीनमध्ये उच्चांकी अन्नधान्य उत्पादन झाल्याचे चीनने म्हटले आहे. वास्तविकता नीट विचार केल्यास जर अशी परिस्थिती असेल तर मग खाण्यासाठीची चीनची धडपड अजिबात होण्याची गरज नाही. अनेकांना खायला मिळत नसल्याने सध्या चीनमध्ये भारतासह इतर देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात आयोत चालू आहे. म्हणजेच चीन काहीतरी लपवत आहे नी खोटेही सांगत आहे. चीनच्या दक्षिण भागात टोळधाड आल्याने पिके सुपडासाफ झालेली आहेत. अशावेळी देशातील जनतेला देशप्रेमाचा डोस देण्यासाठी म्हणून हा शेजारी कुरापतखोर देश सीमेवर तणाव निर्माण करी असल्याचे त्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

संपूर्ण बातमी जशीच्या ताशी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://economictimes.indiatimes.com/hindi/markets/commodities/news/the-countrys-economy-got-a-big-benefit-from-farming-there-was-a-huge-jump-in-sales-of-tractors/articleshow/77871026.cms

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here