धक्कादायक : तर, भारत बनेल मोठा कर्जदार देश; पहा नेमका काय इशारा दिलाय रेटिंग एजन्सीने..!

सध्या जगभरात सर्वात जास्त आर्थिक फटका बसलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताची चर्चा सुरू आहे. यावर केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस माहिती आलेली नसतानाच आता भारत विकासनशील देशांमधील सर्वाधिक कर्जाचा बोजा वाहणारा देश बनण्याची धोकादायक शक्यता वैश्विक रेटिंग एजेंसी मूडीज इनवेस्टर्स सर्विस (Moody’s Investors Service) यांनी व्यक्त केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था शून्याच्याही खाली थेट उणे २३.९ टक्के इतकी घसरली आहे. अशावेळी काहीतरी ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षा असताना सरकारचे समर्थक असे काहीही नसल्याची भलामण करून वेळ मारून नेत आहेत. तर, केंद्र सरकारकडून अजूनही यावर ठोस माहिती किंवा पुढील धोरण याबाबत सांगण्यात आलेले नाही. अशावेळी आता मूडीजने भारत हा पुढील काळात विकसनशील देशांमध्ये सर्वाधिक कर्जदार असलेला देश बनण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

ADVT : या ऑफरचा लाभ घेण्यासाठी https://amzn.to/3gONdMn या लिंकवर क्लिक करून पुढे जावे.

मूडीजने म्हटले आहे की, सध्याच्या करोना विषाणूच्या आपत्कालीन काळात संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसला आहे. मात्र, एकूण वित्तीय तुट लक्षात घेता भारत हा पुढील काळात एक मोठा कर्जदार देश बनण्याची शक्यता आहे. भारतासह ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचीही परिस्थिती अशीच होण्याची शक्यता आहे.

सध्या भारतात कर्ज बुडवून बँकांचा एनपीए वाढवण्याची टक्केवारी मोठी आहे. बड्या कर्जदारांनी सरकारी बँकांची वाट लावलेली आहे. अनेकजण कर्ज बुडवून पसार झालेले आहेत. त्यावरून राजकारण सुरू आहे. मात्र, त्याना पकडण्याची किंवा कारवाई होण्याची वारंवारिता खूपच कमी आहे. अशावेळी भारत हा साध्या सर्वाधिक वित्तीय जोखीम असलेला देश बनला आहे. ही परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली नाही तर मग भारत हा जास्त व्याजाने कर्ज वापरणारा देशही बनू शकतो अशी भीती मूडीजने व्यक्त केली आहे,

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here