म्हणून ‘त्या’ १४ शेअरमध्ये येऊ शकतो विक्रीचा ट्रेंड; पहा काय म्हणणे आहे MACD चे

शेअर बाजारात सोमवारी एक दिवस मोठी घसरण झाल्यावर पुन्हा मंगळवारी त्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. मात्र, पुढील काही कालावधीत जास्त मुव्हमेंट नसलेले १४ शेअरचे भाव घसरू शकतात. त्याचवेळी किमान २०० शेअरचे भाव वाढण्याची शक्यता मूविंग एवरेज कंवर्जेंस डाइवर्जेंस (MACD) यांनी व्यक्त केली आहे.

मूविंग एवरेज कंवर्जेंस डाइवर्जेंस ही संस्था संबंधित शेअरचा २६ दिवसांचा ट्रेंड आणि त्यातील १२ दिवसांची मुव्हमेंट यावर अभ्यास करून काही ठोकताळे जुळवून हा नादाज बांधत असते. आताही त्यांनी अशीच माहिती प्रसिद्ध केल्याचे इकॉनॉमिक टाईम्स यांच्या बातमीत म्हटले आहे. त्यानुसार पुढील काही कालावधीत भाव कमी होण्याची शक्यता असलेल्या १४ शेअरची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

ADVT : या ऑफरचा लाभ घेण्यासाठी https://amzn.to/3gONdMn या लिंकवर क्लिक करून पुढे जावे.

भाव कमी होण्याची शक्यता असलेले शेअर असे :

टाटा पॉवर, अदानी पॉवर, NMDC लिमिटेड, कोल इंडिया, NCC, बजाज फायनान्स लिमिटेड, युपीएल, टेक महिंद्रा, फर्स्टसोर्स सोल्युशन, काजरेया सिरामिक्स, जय कॉर्प लिमिटेड, बॉम्बे डाईंग, स्टरलाईट टेक्नोलॉजीज, PTC इंडिया आदि.

एकूणच सध्याचा बाजाराचा तट्रेंड लक्षात घेऊन आणि संबधित शेअरचा अभ्यास करून मूविंग एवरेज कंवर्जेंस डाइवर्जेंस यांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, बाजार हा अंदाजाच्या पलीकडे अनेकदा गेला आहे. त्यामुळे आपणही याचा योग्य पद्धतीने अभ्यास करून मगच या शेअरबाबत निर्णय घ्यावा. बाजारात कधीही विक्री करून नफा वसुली सुरू होऊ शकते असे अनेकांना वाटत आहे. मात्र, मागील काही दिवसात त्या सगळ्या शक्यतांना बाजूला सारून बाजारातील तेजी कायम आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here