दिल्ली :
भारत-चीन यांच्यातील सीमावाद गंभीर वळणावर आहे. अशावेळी भारत सरकारने चीनसमवेत असलेले आर्थिक संबंध बऱ्याचअंशी बदलले आहेत. त्याचा मोठा फटका मुजोर चीन्यांना बसला आहे. इतकेच नाही तर, चीनची भारताकडे होणारी निर्यात कमी होऊन आता आयात वाढली आहे. कारण, चीनमध्ये भारतीय मालाची मागणी वाढली आहे.
होय, हे वास्तव आहे. संपूर्ण देशात #BoycottChina ची मोहिम जोरात आहे. अशावेळी चीनच्या उत्पादनांची मागणी घटली. रेल्वे, बीएसएनएल, रस्ते महामंडळाने चीनसोबतचे कोट्यवधींचे करार मोडून काढले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने 371 चिनी उत्पादनांवर हळूहळू बंदी आणण्यास सुरुवात केलेली आहे. अशावेळी भारताची चीनकडे होणारी निर्यात वाढली आहे.
देशांतर्गत बाजारात मेड इन इंडिया आणि परदेशी बाजारात निर्यात ही भारताची मोठी गरज आहे. सर्वसामान्यांच्या हाताला काम आणि त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी यावर काम होणे आवश्यक आहे. देशातील छोटे, मध्यम व लघु उद्योग सक्षम बनणे हीच खऱ्या अर्थाने भारताची गरज आहे. सध्या निर्यातीला चांगले दिवस दिसत असले तरी असंघटीत क्षेत्रातील किमान १० कोटी रोजगार गेले आहेत. अशावेळी उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी MSME सेक्टरमध्ये बुस्टर डोस मिळणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत अभियानातून असे झाल्यास त्याचा देशाला मोठा फायदा होईल.
जुलै महिन्यात निर्यातीत चीनमध्ये 78 टक्के, मलेशियामध्ये 76 टक्के, व्हिएतनाम, सिंगापूरमध्ये 37 टकक्यांची वाढ झाली आहे. तर, अमेरिका, इग्लंड, ब्राझील, युरोपियन देश येथील निर्यात घटली आहे.
संपादन : विनोद सूर्यवंशी