धक्कादायक : चीनने केलाय १००० स्क्वेअर किलोमीटरवर कब्जा; पहा काय म्हटलेय ‘हिंदू’च्या बातमीत

एकदम विश्वसनीय बातमी देणारे माध्यम समूह म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘द हिंदू’ने एकदम धक्कादायक आणि डोळे उघडायला भाग पडणारी बातमी प्रसिध्द केली आहे. त्यांनी बातमीत दावा केला आहे की, जवळपास १००० स्केअर किलोमीटर म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना कवेत घेऊ शकेल इतक्या विस्ताराची जमीन चीनने ताब्यात घेतली आहे.

एकूणच काल पुन्हा एकदा चीनी सैन्य भारतीय हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असतानाच आता हे दुसरी बातमीही येऊन धडकली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता खूप ठिकाणाहून येत असलेल्या बातम्यांमुळे नेमकी खरी बातमी कोणती हाच संभ्रम आहे. मात्र, हिंदू दैनिकाने आपल्या बातमीत स्पष्ट दावा केला आहे की, लडाखमधील ९०० स्केअर किलोमीटर यापेक्षाही जास्त जमीन चीन्यांनी ताब्यात घेतली आहे. एकूणच या धक्कादायक बातमीमुळे उलटसुलट चर्चेला पुन्हा उधाण आलेले आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून पुढे जावे.

कालपासून पुन्हा एकदा चीनच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत. भारताचा जीडीपी उणे २३ वर पोहोचल्याची बातमी आली आणि नंतर पुन्हा एकदा चीनच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. चीनचे ८० सैनिक भारताने मारल्याचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी सीमावादाच्या मुद्द्यावर गप्प असलेला चीन आता त्यांच्या ग्लोबल टाईम्स या मुखपत्रातून धमक्याही देत आहे. अशातच हिंदू दैनिकाने ही बातमी केल्याने तीही ट्रेंडमध्ये आहे. अनेकांनी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी हिंदू कधीही खोटी बातमी देत नसल्याचे सांगत ती शेअर केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

द हिंदू यांची मूळ इंग्रजीतील बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :

https://www.thehindu.com/news/national/china-controls-1000-sq-km-of-area-in-ladakh-say-intelligence-inputs/article32490453.ece?homepage=true

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here