EMI बाबत वाचा ‘ही’ महत्वाची बातमी; पहा SC मध्ये का सुरु झाली सुनावणी, आणि काय म्हणालेय सरकार

करोना विषाणूच्या साथीच्या रोगामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने देशातील कोट्यावधींचे रोजगार गेले आहेत. याच कालावधीत कंपन्या, दुकाने आणि संस्था बंद असल्याने ज्यांनी त्यासाठी कर्ज घेतले होते त्यांनाही कर्जाचा हफ्ता (EMI) भरण्यास अडचणी येणार असल्याचे लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या EMI वर सवलत लागू करण्यात आली होती. तीच सवलत आता संपत आहे. मात्र, आता पुढील कर्जाचे हफ्ते कसे द्यायचे याचा मोठा प्रश्न कोट्यवधी लोकांसमोर आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.

होय, याबाबत न्यायालयाने सरकारकडे अशा पद्धतीने सवलत किती दिवस देणे शक्य आहे याची विचारणा केली होती. त्यावर किमान २ वर्षे अशी सवलत देण्याची तयारी असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हटले आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीत हफ्त्यावरच्या पैशांचा भरणा आणि त्यावरील कर्जाच्या प्रक्रियेबाबत न्यायालय निर्णय देईल असे दिसते. एकूणच यामुळे सामान्य कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स

https://amzn.to/3gONdMn

ADVT : या ऑफरचा लाभ घेण्यासाठी https://amzn.to/3gONdMn या लिंकवर क्लिक करून पुढे जावे.

३१ ऑगस्ट २०२० पर्यंत इएमआय न भरण्यासाठीचे सहकार्य करण्याचे आवाहन रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी केले होते. त्यानुसार सामान्य व्याजदर आकारणी करून या कालावधीत कर्जाच्या हफ्त्यावर तगादा न लावण्याचे, लेट फी न घेण्याचे आणि चक्रवाढ व्याज न घेण्याचे सहकार्य बँकांनी केले होते. मात्र, आता ही सवलत अखेर संपत आहे. त्याचवेळी देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. अशावेळी सगळे काही सुरळीत होईपर्यंत लोन मोराटोरियम सुविधा देण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सरकारचे मत घेण्यात आलेला आहे. आता पुढील सुनावणी उद्या म्हणजे बुधवारी (दि. २ सप्टेंबर २०२०) होणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here