Breaking : पहा चीन्यांनी काय ओकलीय गरळ; ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात काय म्हटलेय पहा

शेजारी चांगला असावा असे आपण अगदी घर घेतानाही पाहतो. तिथे आपल्याला निवडीचा हक्काही असतो म्हणा. मात्र, अनेकदा शेतजमीन किंवा घराच्या हद्दीवरूनही आपण कुरापतखोर मंडळींच्या त्रासाला सामोरे जातोच की. तसाच प्रकार जागतिक राजकारणातही आहे. भारताला सगळ्या बाजूने विखारी शेजार मिळालेला आहे. त्यात पाकिस्तान आणि चीन हे तर एकदम वाईट आणि क्रूर मनोवृत्तीचे शेजारी आहेत. आताही त्याच चीन्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.

सध्या लडाखमधील भागात चीनचे सैन्य भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावरून भारताने चीनच्या आर्थिक मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही हा कुरापतखोर शेजारी बदलेला नाही. उलट आणखी वेगळ्या पद्धतीने तोंडावर पाडण्यासाठी तो आतुर झाल्याचे चित्र आहे. भारतीय सैन्य चीनी सैन्याला पुरून उरत असल्याच्या बातम्या आहेत. त्याचवेळी ग्लोबल टाईम्स नावाच्या चीनी मुखपत्रात भारताच्या विरोधात लेख लिहून वेगळ्या पद्धतीने दबावाची खेळी चीनी सरकार खेळत आहे.

ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे की, सीमेवरील या भांडणाचा शेवट फ़क़्त भारताच्या पराभवात आहे. त्या पेपरचे संपादक हु शिजीन याने थेट ट्विटरवर याची पोस्टही शेअर केली आहे. एकूणच यापूर्वी सीमेवर झालेल्या झटापटीत सुमारे १०० चीनी सैनिक संपल्यावरही चीनची खाज काही संपली नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. चीनीच्या या आडमुठ्या धोरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कडक पावले उचलली जात आहेत. जगभरातून इतर देशाची चीनची आर्थिक कोंडी करीत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here